28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeक्रीडायुवराज सिंगची पुन्हा वादळी खेळी

युवराज सिंगची पुन्हा वादळी खेळी

२८ बॉलमध्ये ५९ धावांची खेळी सिक्सर किंगची तडाखेबंद फलंदाजी

बर्मिंघम : वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंड्स लीग सध्या सुरु आहे. या लीगमध्ये इंडिया चॅम्पियन्स आणि ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स यांच्यात उपांत्य फेरीची लढत सुरु होती. भारताच्या संघाचे नेतृत्व युवराज सिंग करत होता. युवराज सिंगने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई केली आहे. युवराज सिंगने यापूर्वी देखील उपांत्य फेरीच्या लढतींमध्येकिंवा नॉकआऊट लढतींमध्ये ऑस्ट्रेलियाची धुलाई केली आहे. २००७ टी २० वर्ल्ड कप, २०११ वनडे मध्ये नॉकआऊट लढतींमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध युवराज सिंगने जोरदार फटकेबाजी केली होती. ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स विरुद्ध देखील उपांत्य फेरीच्या लढतीत युवराज सिंगने आक्रमक फलंदाजी केली.

बर्मिंघमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लीजेंडस लीग मध्ये युवराज सिंगने सेमी फायनलच्या लढतीत युवराजने पाच षटकारांच्या मदतीने २८ बॉलमध्ये ५९ धावांची खेळी केली. युवराज सिंगने पाच षटकार आणि चार चौकार मारले. युवराज सिंगची ही कामगिरी पाहून चाहत्यांना २००७ च्या टी २० वर्ल्ड कपमध्ये त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध केलेल्या ३० बॉलमधील ७० धावांच्या खेळीची अनेकांना आठवण झाली.

युवराज सिंगने २८ बॉलमध्ये ५९ धावा केल्या. युवराज सिंग शिवाय रॉबिन उत्थाप्पाने देखील दमदार कामगिरी केली. त्याने ६५ धावा केल्या. इरफान पठाण आणि युसूफ पठाण या दोघांनी देखील ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई केली. इरफाण पठाणने १९ बॉलमध्ये ५० धावा तर युसूफ पठाणने २३ बॉलमध्ये ५१ धावा केल्या. या मध्ये युवराज सिंगच्या खेळीवर नेटक-यांनी आनंद व्यक्त केला. युवराज सिंग ज्यावेळी ऑस्ट्रेलियन गोलंदाजाची धुलाई करत होता. त्यावेळी चाहत्यांना जुने दिवस आठवत होते.

ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया चॅम्पियन्स लीजेंडसने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये ६ विकेट वर २५४ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा संघ १६८ धावा करू शकला. इंडिया चॅम्पियन्सकडून युवराज सिंग २८ बॉलमध्य ५९9 धावांची खेळी केली. याशिवाय इरफान पठाण, युसूफ पठाण आणि रॉबिन उत्थाप्पाने देखील अर्धशतक केले. धवल कुलकर्णी, पवन नेगी यांनी ऑस्ट्रेलियाच्या दोन विकेट घेतल्या. हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांनी एक एक विकेट घेतली.

पाकिस्तानचा वचपा काढण्याची संधी
ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर युवराज सिंगच्या नेतृत्त्वातील टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लीजेंडस लीगच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. आता अंतिम फेरीच्या लढतीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होईल. १३ जुलै म्हणजेच आजच ही लढत होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR