24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeसोलापूरमहापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना मागितली दोन लाखांची खंडणी

महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना मागितली दोन लाखांची खंडणी

सोलापूर : सोलापूर महापालिकेच्याआरोग्याधिकारी डॉ. राखी माने यांना दोन कोटींची खंडणी मागितल्याने आणि खोट्या बातम्या प्रसारित करुन बदनामी केल्याप्रकरणी प्रहार संघटनेचे अजित कुलकर्णी आणि दोघांवर डॉ. राखी माने यांच्या तक्रारीवरुन सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

डॉ. राखी माने (वय ४८, रा. गॅलेग्जा फोरिया, जुळे सोलापूर) या महापालिकेत आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार भारतीय दंडसंहिता कलम३०८ (२), ३५६, ३५१, (२) ३ (५) खंडणी मागणे, बदनामी करणे कलमानुसार प्रहार संघटनेचे अजित कुलकर्णी, सैपन शेख, रणजित वाघमारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शिवसेना जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांच्या कार्यालयात आणि डॉ. माने यांच्या कार्यालयात ११ जूनपासून आजतागायत वारंवार बदनामी करणाऱ्या बातम्या प्रसारित केल्या आहेत.

याबाबत आपण अजित कुलकर्णी यांच्या कार्यालयात बोलणी करण्यासाठी गेलो असता आरोपी कुलकर्णी यांनी आपणास दोन कोटींची मागणी केली. आपण पैसे देण्यास नकार दिला असता कुलकर्णी यांनी सैफन शेख आणि रणजित वाघमारे यांना आपल्या कार्यालयात पाठवत वारंवार पैशाची मागणी केली. पैसे न दिल्यास त्रास होईल, अशी धमकी दिली. अजित कुलकर्णी यांनी आरोग्य विभागाचे उपसंचालक वरिष्ठ अधिकारी डॉ. राधाकृष्ण पवार यांच्या कार्यालयात जाऊन डॉ. माने यांना दोन कोटी रुपये देण्यास सांगितले. पैसे नाही दिल्यामुळे सर्व तीन आरोपींनी मिळून चॅनेलवर बातमी प्रसारित करुन बदनामी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याचा तपास पोलिस निरीक्षक ढवळे करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR