26.6 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रअंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी

अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी

रायगड : मुसळधार पावसामुळे रविवार दि. १४ जुलै रोजी अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली परिणामी वाकण पाली राज्य महामार्गावर पाली अंबा नदी पुलाजवळ दोन्ही बाजूला रस्त्यावर सखल भागात पाणी भरले होते.
यामुळे सकाळपासून येथील दोन्ही बाजूची वाहतूक तब्बल ६ तास ठप्प होती. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. तसेच याच मार्गावर बलाप गावाजवळही रस्त्यावर पाणी साचल्याने तेथेही वाहतूक खोळंबली होती. दुपारी एक नंतर पाणी ओसरल्यावर वाहतूक सुरू झाली. पालीवरून वाकणकडे व वाकण वरून पालीकडे येणारी वाहतूक बंद झाली होती. खासगी वाहने एसटी बस ट्रक टेम्पो आदी मालवाहू वाहने अडकून पडली होती. रविवार असल्याने शाळा कॉलेज तसेच सरकारी कार्यालय यांना सुट्टी असल्यामुळे विद्यार्थी व चाकरमानी या कोंडीतून सुटले. मात्र इतर प्रवासी व स्थानिक नागरिकांचे हाल झाले.

पाली-वाकण मार्गावरच बलाप गावाजवळ वळणावर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. या पाण्यातून काही वाहने धोकादायकपणे जात होती. मात्र छोटी वाहने अडकून पडली होती. वाकण पाली खोपोली राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. पाली व जांभूळपाडा अंबा नदी आणि भालगूल येथे मोठे पूल बांधण्यात आले. तसेच पाली अंबा नदीवरील एक पूल पूर्ण झाला आहे. तर दुस-या पुलाचे काम सुरू आहे. रस्ता रुंदीकरण व पुलामुळे पावसाळ्यात हा मार्ग सोयीचा व सुखकारक होईल अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र पावसाळ्यामध्ये या सगळ्याचे ंिबग फुटले आहे. पाली अंबा नदी पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर पाणी साचून मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी झाल्यामुळे प्रवासी नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. त्यांची गैरसोय होत आहे.

पाली अंबा नदीवरील पूल बिनकामाचा
अंबा नदीवर नुकताच उंच व रुंद असा मोठा पूल बांधण्यात आला आहे आणि एका बाजूच्या मोठ्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. या आधी आंबा नदीवरील जुना पूल हा रुंद व उंचीने छोटा होता. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात या पुलावरून पाणी जाऊन प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी व वाहतूक ठप्प होत होती. नवीन रुंद व उंच पूल बांधल्यामुळे आता ही समस्या संपुष्ठात येऊन पावसाळ्यात वाहतूक सुरळीत राहील, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेला व प्रवाशांना होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR