22 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeराष्ट्रीयमणिपूरमध्ये पोलिस पथकावर दहशतवादी हल्ला

मणिपूरमध्ये पोलिस पथकावर दहशतवादी हल्ला

जिरीबाम : मणिपूरच्या जिरीबाममध्ये अज्ञात हल्लेखोरांनी केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) आणि राज्य पोलिसांच्या संयुक्त पथकावर घातलावून हल्ला केला. यामध्ये सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला, तर अन्य ३ जवान जखमी झाले. जखमींवर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे दुसरे पथक घटनास्थळी पोहोचले असून, त्यांनी नाकाबंदी करून हल्लेखोरांची शोधमोहीम सुरू केली आहे.

सीआरपीएफ अधिका-यांनी सांगितले की, अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी आज सकाळी ९.४० च्या सुमारास सीआरपीएफच्या २० व्या बटालियन आणि मणिपूर पोलिसांच्या टीमला लक्ष्य केले. १३ जुलै रोजी झालेल्या गोळीबाराच्या घटनेशी संबंधित शोध मोहिमेसाठी संयुक्त सुरक्षा दल मोनबुंग गावात पोहोचले होते तेव्हा ही घटना घडली. त्याचवेळी घात लावून बसलेल्या हल्लेखोरांनी पोलीस पथकावर हल्ला केला. यानंतर पथकाने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली, मात्र हल्लेखोर फरार झाले. या हल्ल्यात सीआरपीएफ जवान अजय कुमार झा शहीद झाल्याचे अधिका-यांनी सांगितले. तो बिहारचा रहिवासी होता. या जवानाचा मृतदेह त्याच्या मूळ गावी पाठवण्याची तयारी सुरू आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR