32.5 C
Latur
Monday, March 31, 2025
Homeमहाराष्ट्रधाराशिवमध्ये जन्मले चक्क २४ बोटांचे बाळ!

धाराशिवमध्ये जन्मले चक्क २४ बोटांचे बाळ!

धाराशिव : महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरातून एक दुर्मिळ घटना समोर आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील ही दुर्मिळ घटना असून उमरगा शहरातील एका मातेने चक्क २४ बोटे असलेल्या बाळाला जन्म दिला आहे.

या बाळाच्या हाताला आणि पायांना प्रत्येकी ६ बोटे आहेत. त्यामुळे, या बाळाची आणि या बाळाच्या आईची शहरात मोठी चर्चा होत आहे. बाळ आणि बाळाची आई हे दोघेही सुखरूप असल्याची माहिती डॉक्टर नचिकेत इनामदार यांनी दिली आहे.

या बाळाच्या आईची ही दुसरी प्रसूती असून त्यांचे नाव रेणुका सागर वीटकर असे आहे. रेणुका यांनी बाळाला जन्म दिल्यानंतर त्याच्या हाताला आणि पायाला प्रत्येकी सहा बोटे असल्याची माहिती समोर आली. ही माहिती कळताच गावातील अनेक जण उत्सुकतेने बाळाला पाहायला येत आहेत. उमरगा शहरात सध्या या बाळाचीच चर्चा होताना दिसत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR