19.3 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeलातूरबोराच्या बागेत दोडका लागवडीतून चांगले उत्पन्न

बोराच्या बागेत दोडका लागवडीतून चांगले उत्पन्न

चाकूर  : प्रतिनिधी
ग्रामीण भागातील शेतकरी पारंपारिक शेतीला फाटा देत शेतकरी नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत. यात चाकूर तालुक्यातील उकाचीवाडी येथील शेतकरी गंगाधर बोळेगावे यांनी आधुनिक शेतीची कास धरत अँपल बोरच्या बागेत आंतरपीक म्हणून दोडका लागवड यशस्वी करीत चांगले उत्पन्न मिळवले आहे. त्यांचा हा प्रयोग अनेक शेतक-यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
चाकूर तालुक्यातील उकाचीवाडी हे नळेगाव ग्रामपंचायत अंतर्गत बारा उंब-याचे गाव आहे. गावची जेमतेम १४० लोकसंख्या आहे. गावात अद्यापही बसची सुविधा नसल्याने बस पाहिलीच नाही. कोणतेही पीक असो बाजारपेठेत आणण्यासाठी डोक्यावरच अर्धा किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. शिवाय अन्य पायाभूत सुविधांचा अभाव आहे. यातूनही मार्ग काढत डांिळब, अँपल बोर, जांभूळ, आंबा आदी फळांची यशस्वी शेती करीत गंगाधर बोळेगावे यांनी खडतर प्रवासातून यशाचा मार्ग तयार केला आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी अँपल बोराची दोन एकरावर व अन्य दोन एकरावर जांभळाची लागवड केली. दोन ओळीतील अंतर अधिक असल्याने शिल्लक जागेत प्लॅस्टिक मिंल्चीग करून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ‘नागा नवीन’ जातीच्या दोडक्याची दोन एकरवर लागवड केली.
मशागत, बेड तयार करण्यापूर्वी तज्ज्ञांंच्या मार्गदर्शनाखाली खताचा बेसळ डोस टाकणे, ंिठबकच्या साहाय्याने नियमीत सिंंचन, द्रवरूप खताचा वापर, जैविक व रासायनिक कीडनाशकांची आवश्यकतेनुसार नियमित फवारणी या नियोजनातून दोडक्याचे भरघोस उत्पादन झाले. दोन एकरात, ७० दिवसात तीन ते चार टन दोडक्याचे उत्पन्न मिळाले. याला बाजारात ५० ते १०० रुपये किलो दराने भाव मिळाला. यामधून जवळपास दोन लाख रुपये उत्पन्न मिळाले. नावीन्यपूर्ण प्रयोगातून पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीच्या माध्यमातून त्यांनी आर्थिक उन्नतीचा मार्ग निवडला आहे. यातून इतर शेतक-यांही प्रेरणादायी ठरणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR