21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रपंकजा मुंडे प्रसारमाध्यमांवर संतापल्या

पंकजा मुंडे प्रसारमाध्यमांवर संतापल्या

मुंबई : आमदार आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याविरोधात प्रसिद्ध झालेल्या काही वृत्तांवरुन त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. यासाठी त्यांनी ट्विट केलं असून त्यातून माध्यमांवर आगपाखड केली आहे. मला साधी विधानपरिषद मिळाली तर माझ्या विरोधात वातावरण सुरु झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच पुरोगामी महाराष्ट्रात असे चित्र का आहे? असा सवालही त्यांनी केला आहे.

पंकजा मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटले की, काही चॅनेलवर मी मानहानीचा दावा करणार आहे. अशी बातमी खात्री न करता देऊ नये साधा लोकशाहीचा संकेत आहे. आता बस्स!! मला साधी विधानपरिषद मिळाली तर सुरू झाले, मुद्द्यांचे बोला. असंवैधानिक आणि अनैतिक काम करणारे लोक आहेत त्यांना रोका. उगीच सनसनी करणारी बातमी देऊ नका. माझ्यावर २०१४ पासून हे असेच करतात. पुरोगामी महाराष्ट्रात असे चित्र? असे का? असा सवाल मुंडे यांनी विचारला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR