31.7 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeलातूरलातूर नीट प्रकरणाचा म्होरक्या गंगाधर यास १९ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी

लातूर नीट प्रकरणाचा म्होरक्या गंगाधर यास १९ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी

लातूर : देशभरात नीट परीक्षेबाबत गदारोळ सुरू असताना नीट गैरवहाराप्रकरणी सीबीआय कोठडीत असलेला लातूर नीट प्रकरणाचा म्होरक्या आरोपी एन गंगाधर अप्पा यास ४ दिवसांची म्हणजेच १९ जुलैपर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या दोघांना आठवडाभरापूर्वीच न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती.

नीट गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी एन गंगाधर अप्पा यांची सीबीआय कोठडी संपली होती. आज याबाबत सीबीआय पथकाने कोर्टात हजर केले असता त्यास ४ दिवसांची न्यायालयीन कोठडी कोर्टाने सुनावली आहे. देशभर गाजत असलेला नीट परीक्षेतील घोटाळ्याचे धागेदोरे महाराष्ट्रात निघाले असून नीट अभ्यासक्रमाचे मराठवाड्यातील केंद्र लातूर येथे चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यातील संजय जाधव आणि जलील पठाण यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. तर आरोपी इराण्णा कोनगुलवार आरोपी फरार आहे.

इरण्णावर कोनगुलवारवर निलंबनाची कारवाई
नीट पेपरफुटी प्रकरणी देशभर गदारोळ माजला असून या गैरव्यवहाराचे धागेदोरे महाराष्ट्रातील लातूर, धाराशिव जिल्ह्यांमध्येही सापडले आहेत. नीटमध्ये गुण वाढवून देण्यासाठी दिल्लीतील आरोपी एन गंगाधर अप्पा याच्याशी संपर्कात असाणारा उमरगा आयटीआरमधील नोकरी करणा-या इरण्णा कोनगुलवार या आरोपीवर प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. या प्रकरणात तो मध्यस्थाची भूमिका वठवत होता अशी माहिती देण्यात आली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR