27.8 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeराष्ट्रीयकेदारनाथमधून २२८ किलो सोने गायब

केदारनाथमधून २२८ किलो सोने गायब

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये केदारनाथ मंदिराची पायाभरणी करण्यावरून वादाला तोंड फुटले आहे. एकीकडे केदारनाथ मंदिराच्या पुजा-यांकडून याला विरोध होत असतानाच ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामि अविमुक्तेश्वरानंद यांनीही दिल्लीत केदारनाथ मंदिर उभारण्यास विरोध केला आहे. एवढेच नाही तर त्यांनी केदारनाथ येथील मंदिराच्या गाभा-यात सोन्याचा मुलामा देण्याच्या कामात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. केदारनाथ मंदिरामधून २२८ किलो सोने गायब झाले आहे, याचा हिशोब कोण देणार? असा आरोप शंकराचार्यांनी केला आहे.

याबाबत स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी सांगितले की, केदारनाथमध्ये सोन्याचा घोटाळा झाला आहे. तो मुद्दा का उपस्थित केला गेला नाही. तिथे घोटाळा ते केल्यानंतर आता दिल्लीमध्ये केदारनाथ मंदिर बांधलं जाईल, तिथे पुन्हा एकदा घोटाळा होईल, असा आरोप शंकराचार्यांनी केला. मागच्या वर्षी केदरनाथ मंदिरातील एक वरिष्ठ पुजा-याने केदारनाथ मंदिरामध्ये सोनाच्याचा मुलामा लावण्याच्या कामामध्ये १२५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. तसेच या कामात सोन्याऐवजी पितळीचा मुलामा दिल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र मंदिर समितीने हा आरोप फेटाळून लावला होता. याबाबत शंकराचार्य म्हणाले की, केदारनाथमध्ये २२८ किलो सोने गायब आहे. कुठलाही तपास झालेला नाही. त्यासाठी कोण जबाबदार आहे? आता ते म्हणताहेत की दिल्लीमध्ये केदारनाथ मंदिर बनवणार आहोत. हे होणार नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR