21.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रपीक विमा योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

पीक विमा योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी
पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत १ रुपयात पीक विमा भरण्याची अंतिम मुदत आज सोमवारी (१५ जुलै) संपत असताना या योजनेला ३१ जुलै २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या संदर्भात माहिती दिली.

राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही काही कारणामुळे पीक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी, यासाठी योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यांची ही मागणी केंद्र सरकारने आज मान्य केली. सध्या राज्यात विविध योजनांसाठी लाभार्थीची सेवा केंद्रांवर गर्दी होत आहे. त्यामुळे शेतक-यांना अर्ज आणि लागणारी कागदपत्रे जोडताना सर्व्हरची गती मंद झाली आहे. यामुळे अनेक शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित आहेत. परिणामी पीक विम्याचा अर्ज करण्यास मुदतवाढ मिळावी, यासाठी राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने केंद्र सरकारला पत्रव्यवहार करण्यात आला होता. तसेच स्वत: धनंजय मुंडे याबाबत पाठपुरावा करीत होते. केंद्र सरकारने राज्याची विनंती मान्य करीत पीक विमा योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली. शेतक-यांना पीक विमा भरण्यासाठी मुदत वाढवून दिल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी एक्स या समाज माध्यमातून केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे आभार मानले आहेत.

केंद्राकडे केली होती विनंती
शेतक-यांना अर्ज आणि लागणारी कागदपत्रे जोडताना सर्व्हरची गती मंद झाली आहे. त्यामुळे अजूनही अनेक शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे मुदतवाढीसाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने केंद्राकडे पत्रव्यवहार केला होता. त्याची दखल घेऊन पीक विम्यासाठी मुदतवाढ दिल्याचे सांगण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR