मुुंबई : शाहरुख खानसोबत ‘कभी हा कभी ना’ मध्ये दिसलेली अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीचे ट्वीट चर्चेत आहे. नुकतीच ती बर्लिनमधील एका नेकेड पार्टीत सहभागी झाली होती. तिथले दृश्य पाहून तिने तिथून पळच काढला. तिथून आल्यानंतर अंघोळ करुन गायत्री मंत्र म्हणण्याची तिची इच्छा झाली. नेमके काय घडले हे तिने ट्वीटमध्ये सांगितले आहे.
सुचित्राने ट्वीट करत लिहिले, नुकतेच मी बर्लिनमध्ये बॉडी पॉझिटिव्हिटी/ नेकेड पार्टीमध्ये सहभागी झाले होते. आपले डोकंच खराब होईल इतक्याही पुढारलेल्या विचारांचे होऊ नये, असा विचार त्या ठिकाणी जाऊन माझ्या मनात आला. मी कायमच एक स्वदेशी मुलगी राहीन. आता घरी जाऊन अंघोळ करुन गायत्री मंत्राचा जप करण्याची गरज आहे. बापरे. बॉलिवूड हंगामाशी बोलताना सुचित्रा कृष्णमूर्ती म्हणाली अशा गोष्टी इथे कॉमन आहेत. बॉडी पॉझिटिव्हिटीला प्रमोट करण्याचा आणि शरिराबाबत चिंता दूर करण्याचा याचा उद्देश आहे.
मला वाटले चला अनुभव घेऊया. माझ्या एका मित्राच्या मित्राने ही पार्टी एका बारमध्ये ठेवली होती. मला पाहुण्यांच्या यादीत ठेवले गेले होते. मी तिथे गेले पण लगेच तिथून पळ काढला. कारण मी एक स्वदेशी मुलगी आहे. मला कोणाचे बॉडी पार्ट्स बघण्यात रस नाही. ती पुढे म्हणाली, याचा उद्देश चांगला होता. वल्गर तर अजिबातच नव्हते. पण भारतीय म्हणून आपण आपल्या शरीराबद्दल सावधगिरी बाळगतो. प्रत्येक गोष्ट सांभाळतो, लपवतो. मी त्या पार्टीत २० ते ३० मिनिटे होती. ही पार्टी पूर्ण रात्रभर चालणार होती. हा पब्लिक इव्हेंट नव्हता केवळ आमंत्रण असेल तरच जायचे होते.