29.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रखेडकर यांच्या मातेचा पिस्तूलनंतर रात्रीच्या अंधारात दांडे आणि कु-हाडीचा व्हीडीओ

खेडकर यांच्या मातेचा पिस्तूलनंतर रात्रीच्या अंधारात दांडे आणि कु-हाडीचा व्हीडीओ

पुणे : भपकेबाजीवरून वादात सापडलेल्या ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर व त्यांच्या कुटुंबाबाबत एकेक धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. पूजा यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांचा काही दिवसांपूर्वी पिस्तूल घेऊन मुळशीतील शेतक-यांना धमकावतानाचा जुना व्हीडीओ व्हायरल झाला होता. आता रात्रीच्या अंधारात दांडे, कु-हाडी घेऊन पोलिसांसह नागरिकांना दमदाटी करतानाचा व्हीडीओ समोर येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा व्हीडीओ पोलिसांनीच पुरावा म्हणून रेकॉर्ड केलेला आहे.

हा प्रकार २०२२ मधील आहे. बाणेरमध्ये मेट्रोचे काम सुरु आहे. या भागात खेडकर यांचा ओमदीप बंगला आहे. त्या बंगल्यासमोरून मेट्रो जात आहे. या कामावरून मनोरमा आणि त्यांच्या कुटुंबाने मोठा वाद घातला होता. मेट्रो कामासाठी आणलेले साहित्य मेट्रो कर्मचा-यांनी तेथील फुटपाथवर उतरविले होते. यावरून मनोरमा आणि कुटुंबियांनी वाद घातला होता. या वादानंतर पोलिसांना बोलविण्यात आले होते. या व्हीडीओमध्ये अंधारात पोलिस दिसत असून एक महिलाही जोरजोराने भांडताना दिसत आहे. तुम्ही कायदा हातात घेत दांडे आणि कु-हाडी घेऊन येताय मग कोणाला सांगायचे. आम्ही कशासाठी आलो. तुमचे काम नाही का आमच्याशी बोलायचे, असा सवाल पोलिस मनोरमा आणि त्यांच्या सहका-यांना विचारताना दिसत आहेत. पोलिस त्यांना विचारत असताना एक तरुण येऊन त्यांचा व्हीडीओ रेकॉर्डिंग थांबविण्यासाठी कॅमेरासमोर हात धरताना दिसत आहे.

पूजा खेडकर यांच्या मातोश्रींवर पिस्तुल प्रकरणी एफआयआर नोंदविण्यात आला आहे. तसेच आज पुणे पोलीस त्यांच्या घरी पोहोचले आहेत. यापूर्वी पूजा खेडकर यांच्या ऑडी गाडीची नोटीस देण्यासाठी पोलीस गेले असता मनोरमा यांनी पोलिसांना आणि पत्रकारांना धमक्या दिल्या होत्या. तुम्हाला आत टाकेन असे म्हणाल्या होत्या. तसेच गेटही उघडले नव्हते. यामुळे या वादग्रस्त मनोरमा खेडकर यांच्यावर पोलीस काय कारवाई करतात याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. बिल्डर बाळाच्या कुटुंबानंतर आता आयएएस खेडकर कुटुंबाची अरेरावीचे एकेक प्रकार समोर येत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR