27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeनांदेडरहिमपूर भागात युवकाचा खून

रहिमपूर भागात युवकाचा खून

ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या गुन्ह्याची मालिका सुरूच

नांदेड : प्रतिनिधी
ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या घटनांची मालिका सुरूच असून. दोन दिवसांपूर्वी हिलाल नगर भागामध्ये दारूच्या कारणावरून एका युवकाचा खून झाला होता. तर मंगळवारी रात्री रहिमपूर भागामध्ये पुन्हा एका युवकाचा खून झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

रहिमपूर भागातील शेख शाहबाज शेख शकील (२३ वर्षे) या युवकाचा तलवार, चाकू, खंजीरने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. सदर घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली.

मयताचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयामध्ये पाठविण्यात आला आहे. सदर घटनेबाबत अद्याप ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला नव्हता. तक्रारीनंतर गुन्हा दाखल करू असे पोलिसांनी सांगितले.

ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत सतत खुनाच्या घटना घडत आहेत. दोन दिवसांपूर्वीच हिलाल नगर भागामध्ये दारू पिण्याच्या कारणावरून एका युवकाचा तलवारीने भोसकून खून केला होता. त्या पाठोपाठ रहिमपूर भागामध्ये त्याच पद्धतीने तलवारीने भोसकून खून केल्याची घटना घडली आहे. सदर घटनेबाबत अद्याप कोणतीही नोंद झाली नव्हती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR