जिंतूर : जवाहर प्राथमिक विद्यालय संस्थेचे सचिव तथा विद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी के.डी वटाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशीनिमित्त बालगोपाळांच्या दिंडीचे आयोजन आज करण्यात आले होते. या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी साधूसंतांची व वारक-यांची वेशभूषा धारण केली होती. या दिंडीने शहरातील नागरीकांचे लक्ष वेधून घेतले होते.
यामध्ये विठ्ठलाच्या वेशभूषेमध्ये योगीराज गायके, प्रिन्स कापसे, लक्ष्मण तरटे, कार्तिक कारले, रुक्मिणीच्या वेशभूषेध्ये खुशी मस्के, माही टोकशा, श्रद्धा भराडे, श्रावणी भराडे, ज्ञानेश्वरी सांगळे, संत मीराबाई उत्कर्षा इखे, संत ज्ञानेश्वर प्रथम शहाणे, संत तुकाराम स्वराज आवचार, मुक्ताबाई आराध्या घुट्टे ,श्रद्धा मसुरे, संत नामदेव विशाल ढवळे, संत गाडगे महाराज साईराज मसुरे, संत कान्होपात्रा जानवी भालेराव, संत जनाबाई सोनाक्षी भालेराव, संत गोरा कुंभार उर्जित पारडे तर वरद लिखे, यशराज ठोंबरे, आर्यन गिरे, कृष्णा गायकवाड, अनया बन्सा, ज्ञानेश्वरी सांगळे, बालाजी गीते, आराध्या देवडे, कार्तिकी जगताप, आराध्या घुगे अशा अनेक विद्यार्थ्यांनी सुंदर वारक-यांची वेशभूषा धारण केली होती.
वारक-यांची ही दिंडी टाळ मृदुंगाच्या गजरात विद्यालयापासून येलदरी रोड, मोंढा रोड, जागृत हनुमान मंदिरा पर्यंत आल्यावर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी फुगडी तसेच टाळ मृदंगाच्या चालीवर पावली खेळली. नंतर दिंडी विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत नेण्यात आली. दर्शन घेतल्यानंतर दिंडी परत मेन रोड, पोलीस स्टेशन समोरून, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे विद्यालयात आली. विद्यालयात आल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांना केळी व फराळाचे वाटप करण्यात आले. या दिंडीमध्ये जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य बळीराम वटाणे, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मते, संस्थेचे संचालक किशनराव वटाणे, राजेश वटाणे व सर्व शिक्षक वृंद सहभागी झाले होते.