22.6 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeराष्ट्रीयपहिले आनंदात हनिमून, लग्नाच्या २ महिन्यांनी पती नावडता झाला

पहिले आनंदात हनिमून, लग्नाच्या २ महिन्यांनी पती नावडता झाला

देहराडून : एका लग्नाची अजब कहाणी समोर आली आहे. यात एक महिला लग्नानंतर दोन महिन्यांनी माहेरी आली. ती म्हणाली आता मला माझ्या प्रियकरसोबत राहायचे आहे. सासरच्या घरी परत जायचे नाही. मुलीचे बोलणे ऐकून आई-वडील स्तब्ध झाले.

त्यांनी याचे कारण विचारले असता तिने तिला पती आवडत नसल्याचे सांगितले. कुटुंबीयांनी मुलीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण ती ठाम राहिली. हे अजब प्रकरण उत्तराखंडच्या बागेश्वर जिल्ह्यातील आहे. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यावर वधूकडील लोक तिच्या सासरकडून आलेले सर्व सामान परत करतील आणि लग्नात झालेल्या खर्चाचीही परतफेड करतील, असा निर्णय घेण्यात आला. यानंतर नववधू प्रियकराच्या घरी गेली. प्रकरण गरुड तहसीलचं आहे. पिंगलो गावातील तरुणीचे दोन महिन्यांपूर्वी गरुड येथील एका तरुणासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर ती पतीसोबत हनिमूनलाही गेली होती. दोन महिने सर्व काही सुरळीत चालले. वधू आनंदी होती आणि तिच्या सासरचे लोकही आनंदी होते. पण दोन महिन्यांनी अचानक नववधू म्हणू लागली की तिला तिच्या माहेरच्या घरी जावसे वाटत आहे. तिच्या सासरच्यांनीही तिला आनंदाने तिच्या आईवडिलांच्या घरी पाठवले.

काही दिवस इथे राहिल्यानंतर तिला आई-वडिलांनी विचारलं, की तू सासरी कधी जाणार? तेव्हा वधूने असं उत्तर दिलं की सगळेच थक्क झाले. वधू म्हणाली- मला माझा नवरा आवडला नाही. मला आता त्याच्यासोबत राहायचे नाही. माझा एक प्रियकर आहे. मला त्याच्यासोबत राहायचे आहे. सुरुवातीला तिच्या आईवडिलांना वाटलं, की ती मस्करी करत असेल. पण वधू आपल्या म्हणण्यावर ठाम असल्याचे पाहून त्यांनाही धक्का बसला. त्यांनी तिच्यासमोर हात जोडून असं न करण्यास सांगितले. दोन घरांच्या सन्मानाचा प्रश्न असून तुझ्या पतीने किंवा सासरच्यांनी काही चुकीचे केले आहे का? असे त्यांनी विचारले. यावर वधू म्हणाली ते सर्व खूप छान आहेत. पण माझे माझ्या पतीवर प्रेम नाही. मी माझ्या प्रियकरावर प्रेम करते. लग्नापूर्वी आमचे अफेअर होते. मला माहीत होते, की तुम्ही लोक हे नाते मान्य करणार नाही. म्हणूनच तुमच्या सांगण्यावरून मी दुस-या ठिकाणी लग्न केले. पण मी माझ्या नव-याच्या प्रेमात कधीच पडले नाही. मला माझ्या बॉयफ्रेंडसोबत राहायचे आहे.

यानंतर वधू थेट प्रियकराच्या घरी गेली. ही बातमी नवरीच्या सासरच्या मंडळींपर्यंत पोहोचली. याबाबत त्यांनी पोलिसांची मदत घेतली. दोन्ही पक्षांना पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. तिथेही नववधूने सांगितले, की तिला तिच्या प्रियकरसोबत राहायचे आहे. दोन्ही पक्षांनी गुन्हा दाखल केला नाही. आपापसात तडजोड केली. वधूच्या बाजूने मुलीच्या सासरच्यांना सांगितले गेले, की ते लग्नाचा संपूर्ण खर्च आणि दागिने परत करतील. आता वधू तिच्या प्रियकरासह राहत आहे. दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR