हैदराबाद : तेलंगणा उच्च न्यायालयाने नुकतेच नवरत्न तेल, गोल्ड टर्मेरिक आयुर्वेदिक क्रीम, बोरोप्लस अँटीसेप्टिक क्रीम, बोरोप्लस प्रिकली हीट पावडर आणि सोनाचांदी च्यवनप्राश याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. या सगळ्या गोष्टी सौंदर्यप्रसाधने नव्हे तर ड्रग्ज (औषधे) असल्याचे तेलंगणा उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
तेलंगणा उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की हिमानी नवरत्न तेल, बोरोप्लस अँटिसेप्टिक क्रीम सारखई सहा उत्पादने औषधांच्या श्रेणीत मोडतात. उच्च न्यायालयाने दिलेल्या या निकालाने ही सगळी उत्पादने औषधे असल्याचे स्पष्ट केले आणि ते जीएसटीच्या कक्षेत येत असल्याचे म्हटले. न्यायाधीश सॅम कोशे आणि न्यायाधिश एन. तुकारामजी यांच्या खंडपीठासमोर हिमानी नवरत्न तेल, बोरोप्लस अँटी सेप्टीक क्रिम, बोरोप्लस प्रिंकली हीट पावडर, हिमानी निरोगी दंत मंजन लाल, सोना चांदी च्यवनप्राश ही उत्पादने सौंदर्यप्रसादने आहेत की औषधे यासंदर्भात सुनावणी पार पडली. जीएसटी लागू होण्यापूर्वीच निर्माण झालेला २० वर्षे जुना वाद सोडवत खंडपीठाने यासंदर्भात महत्त्वपूर्ण निकाल दिला. १९९७ पासून, हिमानी लिमिटेड आणि इमामी लिमिटेड आणि तत्कालीन आंध्र प्रदेश विक्रीकर विभाग यांच्यातील भागीदारी असलेल्या कंपन्यांमधील हा मुद्दा वादात होता.