23.2 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रअंत्ययात्रेत ट्रक घुसला; ३ ठार

अंत्ययात्रेत ट्रक घुसला; ३ ठार

आळेफाटा : नगर-कल्याण महामार्गावर गुळंचवाडी (ता.जुन्नर) शिवारात भीषण अपघात झाला आहे. नगरकडून येणारा भरधाव ट्रक अंत्यविधी उरकून घरी निघालेल्या लोकांमध्ये शिरला यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली.

यावेळी ट्रकने महामार्गावर असलेल्या आठ ते दहा वाहनांना धडक दिली असून त्याचे मोठे नुकसान झाले आहे. जखमींना आळेफाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. आळेफाटा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिकांनी महामार्गावर आंदोलन सुरु केले आहे. अपघातात मृत्यू व जखमींची सख्या वाढू शकते असे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR