25.1 C
Latur
Friday, January 17, 2025
Homeमहाराष्ट्रवाघनखं म्हणजे निवडणुकीसाठी केलेला जुमला

वाघनखं म्हणजे निवडणुकीसाठी केलेला जुमला

मुंबई : आम्ही वाघनखांचा अपमान करत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार वाघनखांचा अपमान करत आहेत. महायुती सरकारने महाराष्ट्रातील जनतेच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेचा व्यापार चालवला आहे, वाघनखं ही मते मागण्याची वस्तू आहे का, राजकारण करण्याची वस्तू आहे का, असा खडा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी करत वाघनखं म्हणजे निवडणुकीसाठी केलेला जुमला असल्याची टीका शिंदे सरकारवर केली आहे.

दरम्यान, गेली शेकडो वर्षे लंडनच्या म्युझियममध्ये असणारी वाघनखं गुरुवारी (१८ जुलै) महाराष्ट्रात आणण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ही वाघनखं महाराष्ट्रात कशी आली, असा प्रश्न उपस्थित करत संजय राऊत यांनी महायुतीवर आगपाखड केली आहे. तसेच, वाघनखांच्या मुद्यावरून सत्ताधारी महायुती राजकारण करू पाहत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

शनिवारी सकाळी माध्यामांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, आम्हाला छत्रपतींच्या वाघनखांबद्दल नितांत आदर आणि श्रद्धा आहे. पण तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर वाघनखं वाघनखं करत आहात. पण ही वाघनखं तीच आहेत का, हे कोणीही खात्रीने सांगू शकणार नाहीत. वाघनखांवर बेइमान लाकांनी बोलू नये, ते स्वत: डुप्लिकेट आहेत त्यामुळे त्यांनाही डुप्लिकेट मालाचे आकर्षण आहे. लोकांना फसवण्याचे काम सुरू आहे, ती तुमच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही.

ती वाघनखं जर खरेच छत्रपती शिवाजी महाराजांची असतील तर ती आनंदाची बाब आहे. पण ती वाघनखं शिवरायांची नाहीत, असे काही पुराव्यांच्या आधारे बोलले जात आहे. महाराष्ट्रातील काही इतिहासतज्ज्ञ आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार, ती शिवरायांची वाघनखं नाहीत. इतकेच नव्हे तर लंडनच्या ज्या वस्तुसंग्रहालयात ती वाघनखं होती, तेथील प्रशासनालाही ती वाघनखं शिवरायांची असल्याची खात्री नाही. त्यामुळे आता निवडणुका तोंडावर आल्या आहेत त्यामुळे निवडणुकीसाठी भाजपचा हा जुमला असल्याचा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR