29.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeपरभणीदुधगाव चोरी प्रकरणातील दोन आरोपींना पोलिस कोठडी

दुधगाव चोरी प्रकरणातील दोन आरोपींना पोलिस कोठडी

बोरी : जिंतूर तालुक्यातील दुधगाव येथील शेतातील पत्रे व तुषार संच चोरी प्रकरणातील दोन आरोपींना परभणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी दि.१९ जुलै रोजी पकडून बोरी पोलिसांच्या ताब्यात दिले. या आरोपींना कोर्टामध्ये हजर केले असता ३ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

दुधगाव येथील रामेश्वर बबनराव पारवे यांच्या शेतातील आखाड्यावरील पत्रे व तुषार संच असे एकूण ५० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पारवे यांच्या फिर्यादीवरून बोरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी परभणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी १९ जुलै रोजी झरी येथून सेवकसिंग रेड्डीसिंग बावरी (वय २०), दशरथसिंग बादलसिंग जुन्नी या दोन आरोपींना ताब्यात घेऊन बोरी पोलीसांच्या ताब्यात दिले.

त्यांच्याकडून सहा पत्रे व एक बोलोरो पिकप असे एकूण १० लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजय पंतोजी, संजय काळे, श्रीराम दंडवते, कृष्णा शहाणे हे करित आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR