उस्मानाबाद : प्रतिनिधी
‘खिदमत ए खल्क फॉंडेशन उस्मानाबाद ’ च्या वतीने यावर्षी १०१ झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. त्या उपक्रमांतर्गत उस्मानाबाद शहरातील प्रियदर्शनी प्रा.शाळा व सत्यभामा शिंदे हायस्कूल च्या प्रांगणात शुक्रवारी २० जुलै २०२४ शनिवार रोजी सकाळी १०:३० वाजता वृक्षारोपण आणि वृक्ष वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानाबादचे सुपुत्र व सध्या आखाती देशात अभियंता म्हणून कार्यरत मा.हबीब जुबेर बिन नासर साहेब , उस्मानाबाद शहरातील नामवंत सिमेंट व्यापारी व माजी. शिक्षण सभापती, उस्मानाबाद गुलमीर खान पठाण हे हजर होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आणि शाळेतील मुलांना त्यांचे हस्तेच वृक्ष वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन फाउंडेशन मार्फत तर उत्कृष्ट नियोजन दोन्ही शाळेच्या मुख्यध्यापक मा.पटेल सर व मा.शिंगडे सर व त्यांच्या कर्मचारी वर्गा मार्फत करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी पणे पार पाडण्यासाठी फाउंडेशन चे नुरुद्दीन शेख , जावेद शेख , मुबारेस सिद्दीकी, मैनुद्दीन शेख , सरदार मुजावर , हाफिज सनाउल्लाह , अजमत सय्यद, फजल सय्यद,फहीम मोमीन,करीम शेख आणि बख्तियार काझी यांनी परिश्रम घेतले.