28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeलातूरसंजय जाधवने गंगाधरप्पास सीबीआय कोठडीत ओळखले

संजय जाधवने गंगाधरप्पास सीबीआय कोठडीत ओळखले

गंगाधरच्या पदरात १६ पैकी ६ लाख रुपये

लातूर : विनोद उगीले
लातूर नीट पेपर लिक प्रकरणात आरोपींमध्ये झालेल्या १६ लाख रुपयांच्या उलाढालीत या प्रकरणातील मास्टरमाईंड एन. गंगाधरप्पा याच्या पदरात टोकन म्हणून ६ लाख रुपये पडल्याचे तपासात समोर आले आहे.

देशभरात चर्चेला आलेल्या लातूर नीट प्रकरणाचा तपास निर्णायक टप्प्यावर आला असून आरोपी संजय तुकाराम जाधव हा तपासात टाळाटाळ करणार होता आणि त्याने त्याच्या पोलिस व सीबीआय कोठडीत सुरुवातीच्या दिवसांत एन गंगाधरप्पा यांच्याशी थेट संबंध असल्याचे स्पष्टपणे नाकारले होते.

एन. गंगाधरप्पा यांच्या निवासस्थानी झडती घेतली असता एन. गंगाधरप्पा आणि संजय तुकाराम जाधव यांच्याशी संबंध जोडणारे विविध पुरावे, दाखले काही नवीन तथ्यांसह सापडले, तेव्हा संजय तुकाराम जाधव यांनी कबूल केले की तो व इतर लोक यूजी एनईईटी संदर्भात एन. गंगाधरप्पा यांच्याशी थेट संपर्कात होते. परीक्षा २०२४ आणि त्यांच्यातील व्यवहाराविषयी त्याच्या तपासात अंशत: उघड झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR