28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रआता तुमचे १२ वाजायला १० मिनिटे शिल्लक

आता तुमचे १२ वाजायला १० मिनिटे शिल्लक

मुंबई : कधी जाहीर सभांमधून, कधी बैठकांमधून, कधी पत्रकार परिषदांमधून तर कधी सोशल मीडियातून दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने येत आहेत. अजित पवारांच्या पिंपरी येथील मेळाव्यात काही कार्यकर्त्यांनी अजित पवारांना घड्याळ भेट दिले. त्यावेळी, कार्यकर्त्यांनी भेट दिलेल्या घड्याळात १२ वाजण्यासाठी केवळ १० मिनिटांचा अवधी असल्याचं छायाचित्रा दिसून येत आहे. त्यावरुन, आता शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

स्वत: कमावलेल्या आणि हिसकावून घेतलेल्या गोष्टीत फार फरक असतो. त्यामुळेच तुम्ही हिसकावून घेतलेले चिन्हे सुद्धा तुमचे १२ वाजायला १० मिनिटे शिल्लक आहे हेच दाखवत आहे असे ट्विट एनसीपीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन करण्यात आले आहे. त्यामुळे, या फोटोवरुनही अजित पवारांना लक्ष्य करण्याची संधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाते नेते आणि पदाधिकारी साधत असल्याचे दिसून येते. स्वत: कमावलेल्या आणि हिसकावून घेतलेल्या गोष्टीत फार फरक असतो.

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय पक्ष एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत. त्यातच, लोकसभा निवडणुकांपूर्वी फुट पडलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतेच एकमेकांविरुद्ध अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अजित पवार गुलाबी रंगांच्या जॅकेटमुळे आणि डीपीडीसी बैठकीमुळे राजकीय वर्तुळात केंद्रस्थानी आहेत.

पुण्यातील बैठकीत अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात थेट शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर, आमदार रोहित पवार, खासदार अमोल कोल्हे यांनीही अजित पवारांवर निशाणा साधला. अजित पवारांनी आज पिंपरीतील मेळाव्यातून यास प्रत्युत्तर दिले. दरम्यान, पिंपरीतील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी अजित पवारांना घड्याळ भेट दिले, त्यावरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा आणि घड्याळ हे चिन्ह देण्यात आले आहे. त्यामुळे, गत लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाची नव्याने स्थापना झाली. त्यानंतर, लोकसभा निवडणुकांसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्हही देण्यात आले होते. मात्र, पक्ष गेलं, चिन्ह गेलं तरीही नव्याने स्थापन केलेल्या पक्षासोबत शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत आपला करिश्मा दाखवून दिला. लोकसभेच्या १० पैकी ८ जागा जिंकत पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पाठीशी महाराष्ट्रातील जनता असल्याचे त्यांनी दाखवून दिले. मात्र, आता विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने दोन्ही राष्ट्रवादीतील नेते प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे एकमेकांवर जोरदार हल्लााबोल करत आहेत.

निवडणूक आयोगाने अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह दिले आहे. अजित पवारांसोबत असलेल्या आमदारांच्या संख्याबळाच्या आणि इतर कायदेशीर बाबींचा उल्लेख करत हे पक्ष व चिन्ह अजित पवारांना देण्यात आले. त्यामुळे, शरद पवार यांनी नवीन पक्षाची स्थापना केली असून त्याचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR