लातूर : प्रतिनिधी
आर्थिक परिस्थिती हालाखीची असलेल्या जिल्ह्यातील अकराशे होतकरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात अग्रेसर असणा-या लातूरच्या दिशा प्रतिष्ठानच्या ‘दिशा दप्तर’ योजनेअंतर्गत शालेय साहित्यांसह दप्तर वाटप जाहीर करण्यात आले. तसेच दुर्बल घटकातील १९ होतकरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कासाठी २ लाख ५० हजार रुपयांचे आर्थिक सहकार्यही करण्यात आलं. दरम्यान भविष्यात लातूर जिल्हा परिषद प्रशासनही दिशा प्रतिष्ठान सोबत काम करण्यास उत्सुक असेल, अशी जाहीर इच्छा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त्त मुख्य कार्यकारी अधिकारी अस्लम तडवी यांनी यावेळी बोलून दाखविली.
येथील विष्णुदास मंगल कार्यालय येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे हे होते. तर जिल्हा परिषद अतिरिक्त्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी आणि उद्योजक दिलीप माने यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘दिशा’प्रतिष्ठानच्या वतीने गेल्यावर्षीपासून आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी ‘दिशा दप्तर’ योजना सुरु करण्यात आली होती. यावर्षीही या योजनेअंतर्गत लातूर जिल्ह्यातील ३९ शाळा व तीन सामाजिक संस्थेतील आर्थिक दुर्बल घटकातील होतकरु असलेल्या ११०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांसह दप्तरांचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रत्येक दप्तरात स्कूल बॅग, टिफिन बॉक्ससह टिफिन बॅग, शूज, सॉक्स, वह्या इत्यादी दर्जेदार साहित्यांचा समावेश होता. ज्यात आपलं घर, रॉबिनहूड आर्मी, खुशीग्राम या तीन सामाजिक संस्थेतील विद्यार्थ्यांचा समावेश होता.
तर कै. जनार्दन राजेमाने आश्रम शाळा जानवळ, विमलबाई माध्यमिक विद्यालय, इंदिरा माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद शाळा जवळगा, श्री महादेव विद्यालय धनेगाव, जिजामाता विद्यालय औसा, वसंतराव नाईक विद्यालय, श्री साई प्राथमिक विद्यालय, परिमल माध्यमिक विद्यालय -लातूर, जि.प. शाळा हनुमंतवाडी, जि.प. शाळा खुलगापूर, जि.प.शाळा महापूर, जि.प. शाळा नांदगाव, जि.प. शाळा कोतल, जि.प.शाळा शिवणी, जि.प.शाळा आशीव, कोतल शिवनी तांडा शाळा, तळीखेड जि.प. शाळा, नर्गिस उर्दू माध्यमिक विद्यालय, कमला नेहरू माध्यमिक विद्यालय, एमडी इकबाल माध्यमिक विद्यालय, बहुजन हिताई विद्यार्थी वस्तीगृह, मेहबूब उर्दू प्राइमरी स्कूल, नर्गिस उर्दू प्राथमिक शाळा, अब्दुल कलाम बरकत नगर, भोयरा जि.प. शाळा, भोसा जि.प.शाळा, जय भवानी विद्यालय सुगाव, साने गुरुजी आश्रम शाळा काडगाव, जि.प. शाळा दर्जिबोरगाव, जि.प. शाळा अरजखेडा, सदानंद शाळा लातूर, मातोश्री केसरबाई जगन्नाथ कडतने शाळा लातूर, मल्हारराव होळकर शाळा, संभाजीराव केंद्रे शाळा आदी शाळांचा समावेश होता. दप्तराचे वितरण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेह-यावरील आनंद हा ओसंडून वाहत होता.
त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील निवडक होतकरु १९ विद्यार्थ्यांना दिशा प्रतिष्ठानच्या वतीने शैक्षणिक शुल्कासाठी २ लाख ५० हजार रुपयांचे आर्थिक सहकार्यही करण्यात आलं. ज्यात नंदिनी कुलकर्णी २० हजार, गायत्री बोयणे २० हजार, सागर खोसे २० हजार, ज्योती लासूने १५ हजार, पांचाळ करिना १५ हजार, सागर पाटील १५ हजार, दीपक वाघ १५ हजार, अंजली बेद्रे १५ हजार, सुमित मैते १५ हजार, कृष्णकांत चव्हान १५ हजार, अम्रता हारडे १२ हजार संध्यारानी सोमवंशी १० हजार, श्रीनिवास देशपांडे १० हजार, परमेश्वर बिरादार १० हजार, श्रद्धा बागल ५ हजार स्रेहल कुलकर्णी ५ हजार, जवादवार साक्षी २ हजार ५००, श्रेयस सोनवणे ५ हजार आदी विद्यार्थ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आलं.
यावेळी विभागीय शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे यांनी त्यांच्या मनोगतात दिशा प्रतिष्ठानच्या या सामाजिक कार्याचे कौतुक केले. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी यांनी आरोग्य क्षेत्रातील ‘दिशा’च्या कार्याचे कौतुक करीत भविष्यात जिल्हा परिषद प्रशासनही दिशा प्रतिष्ठान सोबत एकत्रित काम करण्यास उत्सुक असेल अशी जाहीर इच्छा याप्रसंगी बोलून दाखविली. उद्योजक दिलीप माने यांनीही दिशा प्रतिष्ठानच्या प्रत्येक सामाजिक कार्यात भविष्यात सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे जाहीर केलं. तर ‘दिशा’चे मार्गदर्शक संचालक अभिजीत देशमुख यांनी प्रतिष्ठानच्या आत्तापर्यंतच्या कार्याचा अहवाल सर्वांसमोर आपल्या मनोगतातून मांडला. प्रास्ताविक दिशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू डगवाले यांनी केलं. सूत्रसंचालन बालाजी सुळ यांनी तर आभार ‘दिशा’चे संचालक इसरार सगरे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अॅड. वैशाली यादव, सचिव जब्बार पठाण, विष्णुदास धायगुडे, अजय शहा ओमप्रकाश झुरुळे, बालाजी पिंपळे, शुभम आव्हाड, प्रणिता केदारे, आकाश सावंत, परमेश्वर बिरादार, अनिल ढमाले यांनी सहकार्य केलं. याप्रसंगी लातूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह विद्यार्थी, शिक्षक, पालकांसह लातूरकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.