24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Home२०० रूपयांत घेतली खाण; मिळाला ८० लाखाचा हिरा..!

२०० रूपयांत घेतली खाण; मिळाला ८० लाखाचा हिरा..!

पन्ना : वृत्तसंस्था
मध्य प्रदेशातील पन्ना येथील खाणीत एका मजुराला हिरा सापडल्याची बातमी आली आहे. या हि-याची किंमत ८० लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, लिलावात त्याचा दर आणखी वाढू शकतो. विशेष म्हणजे या मजुराला हिरा सापडलेल्या ठिकाणी खोदाईचा पट्टा आहे. त्याने दोन महिन्यांपूर्वीच ही खाण अवघ्या २०० रुपयात घेतली होती. राजू गोंड असे या पन्नामध्ये नशिबवान मजुराचे नाव आहे.

त्याचे वडील चुनवडा गोंड यांनी दोन महिन्यांपूर्वीच हीरा ऑफिस लीजवर घेतले होते. राजू हा ट्रॅक्टर चालक असून तो खाणीतही काम करतो. याच राजूला उत्खननात एक चमकदार हिरा सापडला आहे.

मध्यप्रदेश मधील पन्ना येथे हि-याच्या अनेक खाणी आहेत. येथील खाण एक वर्षासाठी फक्त २०० रुपये भाडे देऊन लीजवर घेऊ शकतो. हिरे अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोणतीही व्यक्ती पन्नामध्ये हिरे शोधण्यासाठी खोदकाम करू शकते. त्यासाठी २०० रुपये भाडेपट्टी घ्यावी लागते. व्यक्तीचे फोटो, आधार कार्ड आणि २०० रुपये शुल्क जमा केल्यावर भाडेपट्टा एक वर्षासाठी दिला जातो. त्यानंतर पुन्हा ही खाण कार्यालयाकडे जमा करावी लागते.

हिरे शोधण्यासाठी कार्यालयाकडून ८ बाय ८ मीटरची जागा दिली जाते. जिथे खोदकाम करता येते. सरकारी खाणींसह अनेक प्रकारच्या खाणी येथे आहेत. ही जमीन कोणत्याही व्यक्तीची असू शकते. विशेष म्हणजे या लीजमध्ये खोदकाम केल्यावर पुन्हा त्या जागेच्या जमिनीत माती टाकावी लागते. हिरा सापडला तर तो बाहेर काढून उकरलेली माती पुन्हा जमिनीत टाकावी लागते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR