24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयकावड यात्रेच्या मार्गावरील मशिदी, मजार ताडपत्रीने झाकल्या

कावड यात्रेच्या मार्गावरील मशिदी, मजार ताडपत्रीने झाकल्या

हरिद्वार प्रशासनाचा निर्णय वादाच्या भोव-यात

हरिद्वार : कावड यात्रा मार्गावरील ढाब्यांवर नाव लिहून ओळख देण्याचा वाद अद्याप पूर्णपणे शांत झाला नसतानाच आता हरिद्वार प्रशासनाने आणखी एक निर्णय घेतला आहे. तो निर्णय वादाच्या भोव-यात सापडला आहे. यावेळी हरिव्दार कावड मार्गावर येणा-या मशिदी आणि मजार ताडपत्रीने झाकण्यात आल्या आहेत. ज्वालापूरच्या रामनगर कॉलनीतील मशिदीच्या गेटवर आणि दुर्गा चौकाजवळील मजारवर मोठी ताडपत्री लावण्यात आली आहे. मात्र, कावड यात्रेदरम्यान यापूर्वी कधीही मशीद आणि मजार झाकण्यात आली नव्हती.

प्रशासनाच्या या निर्णयावर मशिदी आणि मजारचे काळजीवाहक आणि मौलाना अनभिज्ञ आहेत. यासंदर्भात प्रशासनाने त्यांच्याशी कोणतीही चर्चा केली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर अनेक दशकांपासून कावड इथून जात आहेत आणि कावड मजारच्या बाहेर असलेल्या झाडाच्या सावलीतही विसावतात. पूर्वी लोक इथे चहा-पाणी करत असत. मजारचे केअरटेकर शकील अहमद म्हणाले की, गेल्या ४० वर्षांपासून कावडला घेऊन जाणारे लोक पाहत आहेत. कधीच वाद झाला नाही. यावेळी प्रथमच प्रशासनाने मशिदी आणि मजारचा अंतर्भाव केला. त्यांचा हेतू काय आहे माहीत नाही. प्रशासनाचा हा निर्णय योग्य नाही, असे शकील म्हणाले.

निर्णयाचा मंत्री सतपाल यांनी केला बचाव
दरम्यान, कावड यात्रा पद्धतशीरपणे पार पडावी यासाठी मशिदी आणि मजार झाकण्यात आल्याचे सांगत प्रशासनाच्या निर्णयाचे कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज यांनी बचाव केला आहे. कावड यात्रेत कोणताही जल्लोष किंवा राग नसावा याची दखल घेण्यात आली आहे. कोणतेही बांधकाम असले तरी ते झाकले जाते. आम्हाला या निर्णयावर काय प्रतिक्रिया मिळतात ते पाहूया. त्यानंतर त्याचा अभ्यास करणार असल्याचेही मंत्री सतपाल म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR