पॅरिस : भारताची स्टार नेमबाज मून भाकरने ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी केली आहे. तिने तिस-यांदा पदक मिळवण्याचा पूर्ण ताकदीने प्रयत्न केला. पण यात तिला यश आले नाही. मून भाकर २५ मीटर प्रकारात आणखी एक पदक घेऊन येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
दरम्यान, भारताच्या २२ वर्षीय मनू भाकरने ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. तिने आज पुन्हा एकदा अंतिम फेरी खेळली. याआधी तिने दोन कांस्य पदकांना गवसणी घातली होती. त्यात भर पडते की काय याकडे तमाम भारतीयांचे लक्ष लागले होते. अंतिम फेरीत सुरुवातीला मनूने अचूक नेम धरत चांगली सुरुवात केली. या घडीला मनू भाकर दुस-या क्रमांकावर होती.
मग पुढच्या काही शॉट्सनंतर मनू अडचणीत सापडली. तिच्यासमोर स्पर्धेत टिकून राहण्याचे मोठे आव्हान होते. पण, तिने या कठीण परिस्थितीत अचूक नेम साधत एलिमिनेशनच्या धोक्यातून स्वत:ला बाहेर काढले. त्यामुळे मनू पदकाच्या शर्यतीत कायम होती. कोरियाची खेळाडू पहिल्या क्रमांकावर कायम होती. मनूने सातत्याने चांगले शॉट्स खेळल्याने तिने आणखी एक पदक निश्चित केले असे सर्वांना वाटू लागले. अखेरचे तीन शॉट्स राहिले असताना सामन्यात रंगत आली. मनूने पदकाच्या दिशेने वाटचाल केली होती. पण, मनूला अखेर पदकापासून एक पाऊल दूर राहावे लागले.
फायनलमध्ये ग्रीन हाईटवर निशाणा साधणे गरजेचे असते. रेड लाईटवरचा निशाणा ग्रा धरला जात नाही अर्थात यामुळे संबंधित खेळाडूच्या गुणांमध्ये कमी होते. सुरुवातीला प्रत्येक नेमबाजाने तीन सिरीजमध्ये प्रत्येकी ५ शॉट्स खेळले. एकूण १५ शॉट्स खेळण्याची संधी मिळते. यानंतर प्रत्येक नेमबाजाने ५ शॉट्सची एक सिरीज खेळली. त्यानंतर सुवर्ण पदकाचा निकाल निश्चित होईपर्यंत एक-एक खेळाडू स्पर्धेतून बाहेर होत गेला.