26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeपरभणीपरभणी पोलिस दलातील १४ अंमलदारांना पदोन्नती

परभणी पोलिस दलातील १४ अंमलदारांना पदोन्नती

परभणी : परभणी जिल्हा पोलिस दलातील १४ अंमलदारांची फौजदारपदी बढती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधीच हे आदेश निघाले होते. परंतू आचारसंहितेमुळे हा निर्णय लांबणीवर पडला होता.

२०१३ साली फौजदार पदाच्या परिक्षेतील उत्तीर्ण आणि १९९०च्या पोलिस भरतीतील ६१० अंमलदारांना राज्य सरकारने फौजदारपदी बढती द्यावयाचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणूकीच्या आधीच पदोन्नतीचे हे आदेश मिळतील असे अपेक्षित होते. परंतू आचारसंहितेमुळे तो निर्णय लांबणीवर पडला.

अखेर राज्याच्या पोलिस महासंचालनालयाकडून गुरुवारी या संबंधीचा आदेश काढण्यात आला. त्या आदेशाप्रमाणे परभणी जिल्हा पोलिस दलातील ग्यानदेव बेंबडे, गोविंद घाटगे, शिवाजी भोसले, सुरेश टेंगसे, भिमराव कदम, अशोक हाके, बन्शी मुलगीर, शंकर टाकरस, सुरेश कापसे, संजय मुंढे, बाबु धबडे, रमेश सोनावणे, शेषराव जाधव, गुरुनाथ बनसोडे यांची फौजदारपदी बढती झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR