27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रदिल्लीत मराठी आवाज घुमणार

दिल्लीत मराठी आवाज घुमणार

पुणे : प्रतिनिधी
आगामी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे होणार असल्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने जाहीर केले. आज झालेल्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे तब्बल ७ दशकांनंतर राजधानी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा योग आला आहे. या निमित्ताने मराठी आवाज आता राजधानी दिल्लीत घुमणार आहे. दरम्यान, या निर्णयामुळे राज्यातील पुस्तक प्रकाशकांनी प्रकाशक संघाकडे नाराजी व्यक्त केली.

साहित्य महामंडळाची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी दिल्लीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या संमेलनाचे आयोजन सरहद संस्थेकडून करण्यात येणार आहे. सरहदने २०१४ मध्ये पंजाबमधील घुमान येथे मराठी साहित्य संमेलन आयोजित केले होते. आता राजधानी दिल्लीत संमेलन होणार आहे. फेब्रुवारी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे. हे संमेलन तालकटोरा स्टेडियम किंवा दिल्लीच्या मध्यवर्ती भागात संमेलन आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे. या अगोदर ९७ वे साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथे पार पडले होते.

प्रकाशक नाराज
वर्धा आणि अंमळनेर पुस्तक विक्रीबाबतचा अनुभव तसेच दिल्ली येथे जाण्याचा येण्याचा,तेथील निवास आणि पुस्तक पाठविण्याचा खर्च आणि संभाव्य विक्री लक्षात घेता प्रकाशकांना परवडणार आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. आता महामंडळ प्रकाशक यांना काही सवलत देणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच सामान्य वाचक दिल्लीत जाऊ शकेल का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR