25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeक्रीडाभारतीय हॉकी उपांत्य फेरीत

भारतीय हॉकी उपांत्य फेरीत

ब्रिटनला दिला धक्का, उपांत्यपूर्व सामन्यात पराभव

पॅरिस : वृत्तसंस्था
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या हॉकी संघाने पेनल्टी शुट आऊटमध्ये ग्रेट ब्रिटनला उपांत्यपूर्व फेरीत पराभूत केले आणि थेट उपांत्य फेरीत प्रवेश केला. दोन्ही संघांनी १-१ अशी बरोबरी केल्याने मॅचचा निकाल पेनल्टी शुट आऊटद्वारे लावण्यात आला. भारताचा गोलकीपर श्रीजेशने जोरदार बचाव केल्याने आणि भारताच्या हॉकी खेळाडूंनी पेनल्टी शुट आऊटमध्ये ४ गोल केल्याने ब्रिटनला पराभवाचा धक्का बसला. भारताची उपांत्य फेरीतील लढत आता ६ ऑगस्ट रोजी होणार आहे.

ग्रेट ब्रिटन आणि भारत यांच्यातील मॅचमधील पहिल्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. पहिल्या क्वॉर्टरनंतर भारताच्या अमित रोहिदास याला रेड कार्ड देण्यात आले. त्यामुळे तो बाहेर गेला. त्यानंतर भारताचा कॅप्टन हरमनप्रीत सिंगने एक गोल केला. त्यानंतर ब्रिटनच्या ली मॉर्टनने गोल केल्याने १-१ अशी बरोबरी झाली. त्यानंतर दोन्ही संघांना गोल करता आला नाही. पुढच्या दोन्ही क्वॉर्टरमध्ये भारताच्या बचाव फळीने आणि गोल कीपर श्रीजेशने बचाव करत ब्रिटनचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडले. अखेर मॅच पेनल्टी शुट आऊटमध्ये गेली. तिथे भारताने ब्रिटनला ४-२ असे पराभूत केले.

पी.आर. श्रीजेशचा दमदार बचाव
भारताचा गोलकीपर पीआर श्रीजेश त्याच्या करिअरमधील शेवटचे ऑलिम्पिक खेळत आहे. आजच्या सामन्यात ग्रेट ब्रिटनने आक्रमक खेळी केली. या खेळीला रोखण्याचे काम श्रीजेश आणि बचाव फळीच्या खेळाडूंनी केले. पीआर श्रीजेशच्या बचावामुळे ब्रिटनला गोल करता आले नाहीत. त्यामुळे मॅच पेनल्टी शुट आऊटमध्ये गेली. तिथेही भारतासाठी दोन गोल श्रीजेशने रोखले. त्यामुळे भारताच्या विजयात श्रीजेशचा वाटा मोठा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR