22 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeराष्ट्रीयलाल किल्ल्यावर १५० महिला देणार सक्षमीकरणाचा संदेश

लाल किल्ल्यावर १५० महिला देणार सक्षमीकरणाचा संदेश

नवी दिल्ली : या वर्षी भारत १५ ऑगस्ट २०२४ रोजी आपला ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. या दिवसाला अधिक खास करण्यासाठी देशातील पंचायतींना विविध प्रकारच्या समस्यांपासून मुक्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणा-या महिला प्रतिनिधी लाल किल्ल्यावरून महिला सक्षमीकरणाचा संदेश देणार आहेत.

पंचायत राज मंत्रालयाच्या मानकांनुसार राज्यांनी निवडलेल्या १५० महिला सरपंच, ग्रामपंचायत अध्यक्ष, जिल्हा पंचायत अध्यक्ष आदी महिला पंचायत प्रतिनिधी यावेळी स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सहभागी होणार आहेत. त्यांच्या नेतृत्वक्षमतेला आणखी वाव मिळावा यासाठी येथे राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन तर करण्यात आले आहेच, शिवाय केंद्र सरकारतर्फे त्यांचा येथे गौरव करण्यात येणार आहे.
एक प्रमुख जात म्हणून महिला शक्तीचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी मोदी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे.

राजकारणातील महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी, प्रेरणास्त्रोत म्हणून चांगले काम करणा-या महिला प्रतिनिधींना स्थापन करण्यासाठी एनडीए सरकार वेळोवेळी संधी शोधत आहे. याआधी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी देशभरातून निवडून आलेल्या पंचायत प्रतिनिधींना केंद्र सरकारने आमंत्रित केले होते, परंतु आता स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी पंचायतींच्या निवडून आलेल्या महिला प्रतिनिधींनाच आमंत्रित करण्यात आले आहे.

अलीकडेच, पंचायत राज मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यासाठी त्यांच्या संबंधित राज्यांतील महिला पंचायत प्रतिनिधींची निवड करण्यास सांगितले होते. पंचायतीने कोणताही राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय पुरस्कार पटकावलेला असावा, पंचायतीने महिला व बालविकास, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता किंवा पर्यावरण संरक्षण यासारख्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असावे, सामाजिक-आर्थिक विविधतेसाठी काम केलेले असावे किंवा पंचायत प्रतिनिधी एखाद्या स्वातंत्र्यसैनिकाच्या कुटुंबाशी संबंधित असण्याचे निकष मांडण्यात आले होते. पंचायत राज मंत्रालयाने राज्यांनी पाठवलेल्या अशा महिला लोकप्रतिनिधींची यादी स्वत:च्या मानकांवर तपासल्यानंतर अंतिम यादी तयार केली आहे.

महिला लोकप्रतिनिधींना त्यांच्या पतीसह निमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय राज्यांतील नोडल अधिकारीही व्यवस्था पाहण्यासाठी येणार आहेत. याचा अर्थ देशभरातून १५० महिला प्रधान किवा सरचंप, ग्रामपंचायत अध्यक्ष, ब्लॉक पंचायत अध्यक्ष, जिल्हा पंचायत अध्यक्ष असे एकूण २७४ पाहुणे येणार आहेत. या महिला लोकप्रतिनिधींसाठी १४ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथील डॉ. भीमराव आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे सकाळी १० वाजल्यापासून ‘पंचायत राजमधील महिला नेतृत्व’ या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी सर्व विशेष पाहुणे पंतप्रधान संग्रहालयाला भेट देतील. यानंतर संध्याकाळी केंद्रीय पंचायत राज मंत्री लालन सिंह आणि राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंग बघेल यांच्या हस्ते महिला प्रतिनिधींचा गौरव करण्यात येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR