लातूर : प्रतिनिधी
सह्याद्री देवराईच्या ‘चला सावली पेरुया’ मराठवाड्यातील नाविण्यपूर्ण अशा उपक्रमाची सुरुवात रविवारी येथील श्री देशीकेंद्र विद्यालयाच्या मैदानावर हजारो मुलांच्या साक्षीने झाली. हा उपक्रम जिल्ह्यातील पाच लाख विद्यार्थ्यांपर्यंत नेण्याचा संकल्प सह्याद्री देवराईने केला आहे.
या उपक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे, सह्याद्री देवराईचे सिने अभिनेते सयाजी शिंदे, कवी, लेखक अरविंद जगताप, सह्याद्री देवराईचे समन्वयक सुपर्ण जगताप, जिल्हा परिषद उप कार्यकारी अधिकारी गिरी, प्राथमिक शिक्षण अधिकारी वंदना फुटाणे, देशिकेंद्र विद्यालयचे अध्यक्ष अदिनाथ सांगवे, सचिव माधव पाटील टाकळीकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या उपक्रमांतर्गत लातूर जिल्ह्यातल्या एक लाख मुलांना एक लाख पिशव्या व विविध वृक्षांच्या प्रत्येकी दोन-तीन बियांचे वाटप केले जाणार आहे. सिने अभिनेते सयाजी शिंदे आणि जिल्हाधिकारी वर्ष ठाकूर घुगे यांच्या मुळे हा उपक्रम पाच लाख विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जाण्याचा निर्धार केला. अतिशय उत्साहीच्या वातावरणात अरविंद जगताप यांनी लिहिलेले झाडाचे गुण गाऊ झाडाचे गुण घेऊ या गाण्यावर सयाजी शिंदे यांनी लहान शालेय मुलांसोबत नृत्य केले त्यांना झाडाचे आणि आईचे महत्व समजून सांगितले.
यावेळी सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी स्वत: बिया कसे रोपण करायचे हे मुलांना समजून सांगितले. पिशवीमध्ये माती कशी भरायची, खत कसं भरायचं ,बी कसं टाकायचं आणि पाणी कसं द्यायचं हे समजून सांगितले. अरविंद जगताप यांनीही लहान चिमुकल्यांशी संवाद साधला. प्रास्ताविक करताना सह्याद्री देवराईचे सुपर्ण जगताप म्हणाले की, आपण या लहान हातांना या पर्यावरण पूरक चळवळीत जोडण्यासाठी, त्यांच्या बालमनाला निसर्गाचे, ब्रह्मांडाचे महत्व कळेल. आणि हे हजारो हात लातूरच्या , मराठवाड्याच्या भविष्यातील पर्यावरणाचे रक्षणासाठी तयार होतील.
सूत्रसंचालन प्रा. डॉ. नयन राजमाने यांनी केले. या कार्यक्रमाला बस्वराज येरट, मुख्याध्यापक सगर, शिक्षक, विद्यार्थी, सह्याद्री देवराईचे डॉ. बी. आर. पाटील, दीपरत्न निलंगेकर, ओमप्रकाश झुरळे, स्वामी, सचिन गिरवलकर, शिवशंकर चापुले,अमृत सोनवणे, पूजा बोमणे, पूजा रेड्डी, अभय मिरजकर, डॉ. सीतम सोनवणे, राहुल मातोळकर, राम स्वामी अॅड. सुनील गायकवाड, संजय राजुळे,भीम दुनगावे, प्र.ा. डॉ. दशरथ भिसे, प्रवीण पारिख, श्रीकांत बनसोडे, वैष्णवी पाटील, सपना चामले आदी उपस्थित
होते.