27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रऔरंगाबादमधील ३ मतदारसंघात एक लाखाहून अधिक बोगस नावे ?

औरंगाबादमधील ३ मतदारसंघात एक लाखाहून अधिक बोगस नावे ?

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर येतेय. छत्रपती संभाजीनगरमधील नव मतदार संघांपैकी ३ मतदारसंघात १ लाख बोगस नावं असल्याची तक्रार करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी एमआयएमने दुबार नावांसह बोगस मतदान केल्याचा आरोपही केला आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिका-यांचीही त्यांनी यासंदर्भात भेट घेतली आहे. ज्यांनी दोनदा मतदान केलंय त्यांच्या वर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली असून १ लाखाहून अधिक मतदारांची दुबार नोंदणीच नाही तर दोन वेळा मतदान झाल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. विधानसभा निवडणूक अवघ्या दोन ते तीन महिन्यांवर येऊन ठेपली असताना खैरेंच्या तक्रारीमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
बोगस मतदार तपासण्याची मोहिम

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन नव मतदारसंघांमध्ये तब्बल एक लाखांहून अधिक दुबार नावे असल्याचे तक्रार केली आहे. औरंगाबाद पूर्व, मध्य आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघात एक लाखांहून अधिक बोगस नावे असून शहरातल्या, गावखेड्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघात सारखीच नावे अससून वंचित आणि अन्य पक्षांकडूनदेखील तक्रार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिका-यांकडून बोगस नावं तपासण्याची मोहीम सुरु असून मतदारांनी स्वत:हून दुबार नावं कमी करावीत असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले आहे.

एमआयएमवर दुबार मतदानाचा आरोप
छत्रपती संभाजीनगरच्या ३ मतदारसंघात १ लाखांहून दुबार नावे असून एमआयएमने दुबार मतदानही केल्याचा आरोप खैरेंनी केला. याआधीसुद्धा सर्व पदाधिका-यांना घेऊन मी निवडणूक आयोगाकडे गेलो होतो. त्यांनी त्यावेळेसचे जिल्हाधिकारी चौधरी यांना पत्र दिले होते. त्यांनीही लक्ष दिले नाही. त्यामुळे एकाच घरातल्यांची चार चार ठिकाणी नावेआली. मतदान झाले. पण यावेळी कोणत्याही परिस्थितीत याद्या दुरुस्त करा. दोन्हीकडं मतदान करणं गुन्हा आहे , असे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण ९ मतदारसंघ असून तीन मतदारसंघात दुबार नावे असल्याची तक्रार करण्यात आली आहे. औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पूर्व, आणि औरंगाबाद पश्चिम या तीन मतदारसंघामधून दुबार नावांच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR