पॅरिस : वृत्तसंस्था
भारताची विनेश फोगाट हिचे ऑलिम्पिक पदक हुकले आहे आणि तिला अपात्र ठरवले गेले. तिला ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरवले आहे, कारण तिचे वजन काही ग्रॅम अधिक असल्याचे आढळले आहे. त्यामुळे ऑलिम्पिक समितीने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत विनेश दाखल झाली आणि तिला आव्हानात्मक ड्रॉ मिळाला होता. पहिल्याच सामन्यात तिच्यासमोर टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या जपानच्या युई ससाकीचे आव्हान होते. पण, २९ वर्षीय भारतीय खेळाडूने अव्वल मानांकित ससाकीला चीतपट केले. त्यानंतर उपान्त्यपूर्व फेरीत माजी युरोपियन विजेत्या ओक्साना लिव्हाच हिचे आणि उपान्त्य फेरीत पॅन अमेरिकन्स स्पर्धेतील विजेती युस्रेलिस गुजमनचे आव्हान परतवून लावले.
भारतीय कुस्तीपटू ५० किलो वजनी गटात सहभागी झाली होती आणि तिचे वजन हे १०० ग्रॅम अधिक असल्याचे समोर आले होते. त्यामुळे तिच्यावर अपात्रतेची कारवाई केली गेली आहे. स्पर्धेतील नियमानुसार फोगाटला रौप्यपदकही मिळू शकत नाही. याबाबतची अधिकृत घोषणा झाली आहे. त्यामुळे तिला या स्पर्धेच्या शेवटी समाधानी रहावे लागले.
गेल्या सहा दिवसांपासून विनेश काहीही खात-पित नव्हती. सामन्यापूर्वी तिचे वजन १०० ग्रॅम जास्त होते. ती राखणे तिच्यासाठी खूप आव्हानात्मक होते आणि तेच घडले. नियमानुसार स्पर्धेच्या दिवशी खेळाडूने त्याचे वजन कायम राखणे महत्त्वाचे आहेत. मिळालेल्या वृत्तानुसार मंगळवारी रात्री तिचे वजन दोन किलो अधिक होते. ती संपूर्ण रात्र झोपली नव्हती आणि तिने नियमाचे पालन करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले.
आयओएने एका निवेदनात म्हटले आहे की, महिला कुस्तीच्या ५० किलो गटातून विनेश फोगाटला अपात्र ठरवल्याची बातमी खरी आहे आणि ती खेदजनक आहे. टीमने सर्वोत्तम प्रयत्न करूनही, आज सकाळी तिचे वजन काही ग्रॅम ५० किलोपेक्षा जास्त झाले. यावेळी दलाकडून पुढील कोणतीही टिप्पणी केली जाणार नाही. भारतीय संघ तुम्हाला विनेशच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करतो. हातातील स्पर्धांवर लक्ष केंद्रित करायला आवडेल.