25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeराष्ट्रीयतू लखलखणारे सोने, तूच भारताची प्रेरणा

तू लखलखणारे सोने, तूच भारताची प्रेरणा

फोगटच्या अपात्रतेने धक्का, भारताच्या लेकीसाठी सिनेसृष्टी मैदानात, सर्वत्र हळहळ व्यक्त

मुंबई : प्रतिनिधी
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटसह संपूर्ण भारताचा एक सुवर्णप्रवास सुरु झाला. रौप्य पदक तर निश्चित झालेच होते. परंतु एका गोल्डन स्वप्नाचे सगळ््यांनाच वेध लागले होते. विनेशने सलग तीन स्पर्धा जिंकून मंगळवारी थेट अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यामुळे विनेश आता गोल्ड जिंकणारच, असा विश्वास भारतीयांना वाटत होता. परंतु एका रात्रीत सारेच चित्र बदलले आणि फोगटच अपात्र ठरल्याने भारतीयांच्या स्वप्नावर क्षणात पाणी फेरले गेले. त्यामुळे गोल्डन स्वप्नांचा चुराडा झाला. त्यामुळे सिनेसृष्टीही हळहळली. तसेच तू लखलखणारे सोने, भारताची प्रेरणा असल्याचे सांगत कौतुकाचा वर्षावही केला.

केवळ १०० ग्रॅम अधिक वजनामुळे ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीतील सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगल्याने गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येकाच्या डोळ््यात निराशा दिसली. सिनेसृष्टीतूनही विनेशसाठी सा-यांनी पाठिंब्यासाठी पावले उचलली. त्यामुळे जरी काही ग्रॅमसाठी तिचे ऑलिम्पिक पदक हुकले असले तरी भारताच्या या लेकीची कामगिरी सुवर्णाअक्षरात लिहिली गेली आहे.

मराठीसह बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी विनेशसाठी केलेल्या पोस्टची सध्या चर्चा सुरू आहे. अनेकांनी तिच्यासाठी धिराचे शब्द लिहिले तर काहींनी विनेशला अपात्र ठरवणा-यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तेजस्विनी पंडित, अभिजीत केळकर या मराठी कलाकारांनी तर आलिया भट्ट, स्वरा भास्कर, प्रिती झिंटा या बॉलिवूडच्या कलाकारांनी विनेशवर कौतुकाचा वर्षाव केला.

अभिजीत केळकरने विनेशसाठी पोस्ट करत तुझे अपात्र होणे हे आमच्या जिव्हारी लागले, असे म्हटले तर तेजस्विनीने तुझ्या १०० ग्रॅमने १०० बिलियन्स हृदय तोडली आहेत. तरीही तुझा सार्थ अभिमान आहे. तू आमच्यासाठी चॅम्पियनच आहेस, असे म्हटले. अभिनेत्री प्रीती झिंटाने प्रत्येक भारतीयांसाठी तू लखलखणारे सोने आहेस, असे म्हटले. तू विजेत्यांची विजेती आणि भारतातील प्रत्येक स्त्रीसाठी हिरो आहेस. तू स्ट्राँग राहा आणि पुन्हा हिंमतीने उभी राहा, असे म्हटले.

आलिया भट्टनेही विनेश फोगट तू संपूर्ण देशासाठी खूप मोठी प्रेरणा आहेस. हा इतिहास रचण्यासाठी केलेला तुझा संघर्ष, तुझी जिद्द आणि तुझी कठोर मेहनत तुझ्यापासून कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. पण तूच सोने आहे आणि हे तुझ्याकडून कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. तुझ्यासारखे कुणीच नाही, असे म्हटले.

स्वरा भास्करचा सवाल
विनेश ५० किलो वजनी गटात कुस्ती खेळत होती. पण तिच्या अंतिम सामन्यावेळी जेव्हा तिचे वजन करण्यात आले, तेव्हा ते फक्त १०० ग्रॅम जास्त भरले. त्यामुळे विनेशला अपात्र ठरवण्यात आले. यावर स्वरा भास्करने सवाल उपस्थित करीत १०० ग्रॅम वजनाच्या गोष्टीवर कुणाचा विश्वास बसेल, असे म्हटले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR