25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeअंतरराष्ट्रीयजपान हादरले, त्सुनामीचा इशारा

जपान हादरले, त्सुनामीचा इशारा

टोकियो : वृत्तसंस्था
भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी जपान पुन्हा एकदा हादरले आहे. रिश्टर स्केलवर या धक्क्यांची तीव्रता ७.१ एवढी नोंदवली गेली आहे. तसेच भूकंपाच्या या धक्क्यांनंतर त्सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे.

जपानमध्ये भूकंपाचे हे तीव्र धक्के क्यूशू आणि शिकोकू बेटांवर जाणवले. भूकंपासोबतच जपानमधील मियाजाकी, कोटी, इहिमे, कागोशिमा आणि आइता येथे त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, प्रशासनाकडून परिस्थितीवर बारीक नजर ठेवण्यात येत आहे. तसेच मियाजाकी येथे समुद्रात रोजच्यापेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळत असल्याचे दिसत आहे.

शेकडो बेटांवर वसलेल्या जपानमध्ये सातत्याने भूकंप येत असतात. तसेच समुद्रात भूकंप झाल्यानंतर त्सुनामी येऊन किनारी भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR