25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रवेरूळ घाटात बसला अपघात; ४० प्रवासी बचावले

वेरूळ घाटात बसला अपघात; ४० प्रवासी बचावले

खुलताबाद : छत्रपती संभाजीनगरहून धुळ्याला जाणा-या बसला समोरून भरधाव वेगाने येणा-या टेम्पोने आज दुपारी २ वाजेच्या सुमारास जोरदार धडक दिली. यावेळी बस संरक्षण भिंतीवर चढली, परंतु चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे बस खोल दरीत कोसळण्यापासून बचावली. यामुळे मोठा अपघात टळून बसमधील ४० प्रवाशांचा जीव बालंबाल बचावला.

छत्रपती संभाजीनगर ते धुळे बस (क्रमांक एम एच १५ जेसी ४६६०) ही ४० प्रवासी घेऊन आज दुपारी २ वाजेच्या सुमारास वेरूळ घाटातून जात होती. यावेळी समोरून भरधाव वेगात येणा-या टेम्पोने बसला समोरून जोरदार धडक दिली. जोरदार धडकेमुळे बस वेरूळ घाटातील संरक्षण भिंतीवर चढली.

मात्र, बसचालकाने मोठ्या खुबीने बसवर नियंत्रण मिळवले. यामुळे बस खोल दरीत जाण्यापासून वाचली आणि ४० प्रवाशांचे प्राण बालंबाल बचावले. या अपघातात कोणालाही इजा झाली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR