22.8 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूरउदगीर तालुक्यातील सत्ताधारी पक्षाच्या पदाधिका-यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश 

उदगीर तालुक्यातील सत्ताधारी पक्षाच्या पदाधिका-यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश 

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या उपस्थितीत  उदगीर तालुक्यातील  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ओबीसी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण बतले, (उदगीर)  भाजपचे माजी सभापती उध्दव गंभीरे, (करवंदी) सामाजिक कार्यकर्ते राहुल रक्षाळे,(लोहारा), सचिन वाघमारे विजय हेळगे यांच्यासह हजारो पदाधिका-यांंनी आशियाना निवासस्थानी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार धिरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी   प्रवेश केला प्रवेश केलेल्या सर्वांचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी स्वागत करुन त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. उदगीर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट), भाजपला या प्रवेशामुळे मोठे खिंडार पडले असून यामुळे उदगीर तालुक्यातील काँग्रेस पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत निश्चित फायदा होणार आहे.
यावेळी  जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, उदगीर विधानसभा निरीक्षक रवींद्र काळे, प्रदेश  महिला काँग्रेस सरचिटणीस उषा कांबळे, उदगीर बाजार समितीचे सभापती शिवाजी हुडे, प्रविण बिराजदार, किसान सेलचे तालुकाध्यक्ष पंडीत ढगे, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी श्रीकांत पाटील, ज्ञानोबा गोडभरले, विवेक जाधव, माजी पंचायत समिती सदस्य बबन धनबा, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण बिरादार, तालुका उपाध्यक्ष विपिन जाधव, लोहारचे चेअरमन शेषराव हेळगे यांच्यासह उदगीर तालुका काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले विपिन जाधव, अविनाश उगिले, आदित्य बिरादार, सचिन वाघमारे, प्रवीण पटवारी, चेतन प्रसन्ने, मुन्ना सूर्यवंशी, सतीश बिरादार, अविनाश खरात, प्रशांत हुडगे, शेख अमन, गणेश मलशेट्टे, शंकर खडके, अनिल खडके, आशिष कल्लुरे, अभिजीत वाघ, सुरज काळे, विवेक मुळे, महेश चौधरी, मल्लिकार्जुन बिरादार, हनुमंत मिटकरी, संतोष चौधरी, पवन सूर्यवंशी, अक्षय कांबळे, शेखर सुवर्णकार, गणेश काळे, ब्रह्मानंद हिप्परगांवकर, स्वप्निल मादळे, पवन बोडके, असलम शेख, विजय कांबळे, सचिन वाघमारे, प्रीतम सूर्यवंशी, राहुल बिरादार यांचा सत्कार माजी मंत्री दिलीपराव देशमुख  यांच्या हस्ते करण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR