मुंबई : राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणा-या डीएड (डीएलएड) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, या परीक्षेत मराठी व इंग्रजी माध्यमाचे तब्बल २८ टक्के ‘भावी शिक्षक’ नापास झाल्याचे समोर आले आहे. हा निकाल https://deledexam.in/ या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे ६ ते १४ जून या कालावधीत डीएड परीक्षा घेण्यात आली होती. यंदा द्वितीय वर्षाच्या परीक्षेसाठी १२ हजार ३४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ११ हजार ९४८ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी आठ हजार ६५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, तीन हजार ६८६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
उत्तीर्ण झालेल्यांची टक्केवारी ७१.६६ टक्के एवढी आहे. यशस्वी उमेदवारांना निकालाचे मूळ गुणपत्रक त्यांच्या अध्यापक विद्यालयामार्फत दिले जाईल. उत्तरपत्रिकेची गुणपडताळणी व छायाप्रत मिळवण्यासाठी २१ ऑगस्टपर्यंतची मुदत आहे.
डीएड (द्वितीय वर्ष) निकालाची टक्केवारी
माध्यम उत्तीर्ण अनुत्तीर्ण टक्के
मराठी ११,९४८ ३६८६ ७०.१३
उर्दू २८१७ ६४८ ७७.४८
हिंदी ३०१ ६५ ७८.९६
इंग्रजी १६८९ ५०२ ७१.१३
कन्नड ३४ ३० ९१.४३