सोलापूर (प्रतिनिधी)
सोलापूर महानगरपालिकेच्या पेन्शनर कर्मचाऱ्यांच्या वतीने विविध मागण्यासाठी पुनम गेट समोर आंदोलन करण्यात येत आहे. सदरचे मोदक आंदोलन सदरचे बेमुदत धरणे आंदोलन शुक्रवार पासून सुरू करण्यात आले असून त्यांनी महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गेली चाळीस वर्षे महानगरपालिकेची सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अद्यापही सहा महिने झाले तरी निवृत्ती वेतन ग्रॅज्युटी निवृत्ती वेतन विक्री दिले जात नाही शासनाने सातवा वेतन आयोग लागू केला आहे याचा फरक ही दिला परंतु महानगरपालिका सेवानिवृत्ती धारकांना तांत्रिक अडचण दाखवून आज पर्यंत फरक दिलेला नाही शासकीय सेवकांना आज शासकीय सेवकांना पेन्शन मध्ये 50%अधिक करून दिले जाते मात्र मनपाच्या पेन्शनरना 26 टक्के महागाई अधिक करून चालू आहे त्यापैकी बराच फरक अद्यापही येणे बाकी आहे.
सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असून जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे आम्हा कर्मचाऱ्यांना महागाई त्वरित लागू करावी तसेच ऑगस्ट 2024 चे फरक देण्यात यावा तेव्हा मनपाने येत्या 15 ऑगस्ट पर्यंत याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा वयोवृद्ध उपोषण कर्त्याचे काही बरे वाईट झाले तर त्याची जबाबदारी मनपा प्रशासनावर राहील असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी मनपा पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष माऊली पवार उपाध्यक्ष संजय जोगदंडकर रऊफ बागवान विकास कुलकर्णी नाना शिर्के एफएम चव्हाण एस एस खेडगीकर सौ मेलगे पाटील सौ अग्निहोत्रे सौ यादगिरी काँग्रेस युवक शहराध्यक्ष गणेश डोंगरे युवराज जाधव नागनाथ कदम प्रमिला तुपलवंडे आदी उपस्थित होते.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी पेन्शनर संघटनेला पाठिंबा देत म्हणाले खासदार प्रणिती शिंदे या सोलापुरात आल्यानंतर संघटनेच्या वतीने मनपा आयुक्तांना भेटून मागण्या बाबत चर्चा करू असे आश्वासन नरोटे यांनी दिले.