22.3 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeराष्ट्रीयअदानी घोटाळ्यात थेट सेबी अध्यक्षांचा हात?

अदानी घोटाळ्यात थेट सेबी अध्यक्षांचा हात?

नवी दिल्ली – गेल्यावेळी अदानी ग्रुपवर निशाणा साधणाऱ्या हिंडेनबर्गने आता थेट मार्केट रेग्युलेटरीवर सेबी वर खळबळजनक आरोप केला आहे. सेबी चेअरपर्सन माधबी पुरी बुच याही अदानींसोबत शामील आहेत. त्यामुळेच गेल्या १८ महिन्यापासून अदानी ग्रुपवर कुठलीही कारवाई झाली नाही. हिंडेनबर्गनं शनिवारी सकाळीच त्यांच्या सोशल मीडियावर भारतात काहीतरी मोठे घडणार आहे असा दावा केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा अदानी ग्रुप हिंडेनबर्ग यांच्या निशाण्यावर आला आहे.

सीक्रेट कागदपत्रांचा हवाला देत हिंडेनबर्ग रिसर्चनं म्हटलंय की, अदानी घोटाळ्यात वापरल्या गेलेल्या ऑफशोअर संस्थांमध्ये सेबीच्या अध्यक्षांची हिस्सेदारी होती. एप्रिल २०१७ ते मार्च २०२२ या काळात माधबी पुरी बुच सेबीच्या पूर्णवेळ सदस्याशिवाय त्या अध्यक्षाही होत्या. सिंगापूरमधील अगोरा पार्टनर नावाच्या कंसल्टिंग फर्ममध्ये त्यांची १०० टक्के भागीदारी होती. १६ मार्च २०२२ रोजी सेबी चेअरपर्सन म्हणून त्यांची नियुक्ती होण्याच्या दोन आठवड्यांपूर्वी त्यांनी कंपनीतील त्यांचे शेअर्स पतीच्या नावावर हस्तांतरित केले.

त्याशिवाय सेबीच्या अध्यक्षा आणि त्यांचे पती धवल बुच यांच्याकडे त्याच ऑफशोअर बरमूडा आणि मॉरेशिस फंडमध्ये भागीदारी होती हे आम्हाला माहिती नव्हते. जे विनोद अदानी यांच्याद्वारे वापरण्यात आलेल्या कॉम्प्लेक्स नेस्टेड स्ट्रक्चरमध्ये आढळले होते. माधबी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी पहिल्यांदा ५ जून २०१५ रोजी सिंगापूरच्या फंडमध्ये एकत्र अकाऊंट उघडले होते. गुंतवणुकीचा सोर्स हा सॅलरी आणि जोडप्याची एकूण संपत्ती १० मिलियन डॉलर इतकी आहे असंही हिंडेनबर्ग रिसर्चच्या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR