27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रनागपुरात मनसैनिकांचा खळ्ळखट्याक्

नागपुरात मनसैनिकांचा खळ्ळखट्याक्

नागपूर : प्रतिनिधी
शहराच्या तीस किलोमीटरच्या परिसरात टोलनाका नको असा नियम असताना वाहनधारकांकडून टोल आकारला जात असल्याचा आरोप करत मनसेने नागपुरात टोलनाका फोडत आंदोलन केले.
दरम्यान, राज्यात सध्या नेतेमंडळीचे दौरे सुरू असून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या दौ-याला बीडमध्ये शिवसेना पदाधिका-यांनी विरोध केल्याने मनसे विरुद्ध शिवसेना असा वाद रंगला आहे. आता, नागपूरमध्ये मनसैनिकांनी टोलनाक्यावर पुन्हा एकदा खळ्ळखट्याक् केल्याचे पाहायला मिळाले.

शहराच्या तीस किलोमीटरच्या परिसरात टोलनाका नको असा नियम असताना वाहनधारकांकडून टोल आकारला जात असल्याचा आरोप करत मनसेने हे आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी ५ मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. नागपूरजवळच्या वाडी शहराच्या अवतीभोवती राज्य महामार्गावर १० किलोमीटरच्या अंतरामध्येच तीन टोलनाके आहेत.

या तीनही टोलनाक्यांवर खासगी वाहनांकडून टोल वसूल केला जात नाही. मात्र, वाणिज्यिक वाहनांकडून (माल वाहतूक करणारे वाहन) टोल वसूल केला जातो. त्यामुळे अगदी जवळ जवळ असलेल्या टोलनाक्यांमुळे माल वाहतूकदार त्रस्त झाले होते. माल वाहतूकदारांच्या या तक्रारीनंतर मनसेने आज येथील टोलनाक्यावर जाऊन खळ्ळखट्याक् स्टाईलने आंदोलन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR