27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeअंतरराष्ट्रीयमेडल जिंका नाहीतर कोळशाच्या खाणीत जा

मेडल जिंका नाहीतर कोळशाच्या खाणीत जा

उत्तर कोरियाच्या खेळाडूंना हुकूमशहा किमचा हुकूम

पाँगयाँग : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मोठ्या उत्साहात पार पडले. अनेक देशांच्या खेळाडूंनी मोठी कामगिरी करत पदकांची कमाई केली. जगातील अनेक देशांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला होता, पण अनेक देशांच्या खेळाडूंना या स्पर्धेत पदकांची कमाई करता आली नाही. या यादीत नॉर्थ कोरियाचेही नाव येते. नॉर्थ कोरियाच्या खेळाडूंनी या ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी केली नाही. नॉर्थ कोरियाच्या हुकूमशहा किम जोंग उनचा स्वभाव जगाला माहिती आहे. शिक्षा देण्याच्याबाबतीत प्रसिद्ध आहेत. किम जोंग उन ओलिम्पिकमध्ये पदक न मिळणा-या खेळाडूंना शिक्षा देतात असे बोलले जाते.

या वर्षीच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नॉर्थ कोरियाच्या १६ खेळाडूंनी भाग घेतला होता. १६ खेळाडूंनी ६ पदके जिंकली असून त्यात २ रौप्य आणि ४ कांस्य पदकांचा समावेश आहे. यावेळी नॉर्थ कोरियाला एकही सुवर्णपदक मिळालेले नाही. ऑलिम्पिकमध्ये जगभरातील अनेक देश सहभाग घेतात, पण ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणा-या देशाची चर्चा जगभरात होत असते.

नॉर्थ कोरियाच्या खेळाडूंकडून मोठी चूक
या ऑलिम्पिकमध्ये नॉर्थ कोरियाच्या खेळाडूंनी पदकांची कमाई केली नाही, वरती आणखी एक मोठी चूक केली. नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरियामध्ये गेल्या काही दिवसांपासून मतभेद आहेत. ऑलिम्पिकमध्ये नॉर्थ कोरियाचे काही खेळाडू साऊथ कोरियाच्या खेळाडूंसोबत सेल्फी घेत असल्याचे समोर आले. हे फोटो व्हायरल झालेत, यामुळे आता या खेळाडूंना किम जोंन उन शिक्षा देऊ शकतात.

शिक्षा काय असते?
नॉर्थ कोरियामध्ये खेळाडूंना ऑलिम्पिक पदकांचे टारगेट दिलेले असते. काही खेळाडूंनी जर टारगेट पूर्ण केले नाहीतर त्या खेळाडूंना कमी दर्जाच्या घरात राहण्यास सांगितले जाते, आणि काहींना काही दिवसांसाठी कोळसा खाणींमध्ये काम करण्यासाठी पाठवले जाते. तर पदक जिंकणा-या खेळाडूंना मोठे बक्षिसही दिले जाते. पदक जिंकणा-याला घर, कार आदी भेटवस्तू दिल्या जातात.

पदकांचे टारगेट दिले जाते
२०१२ मध्ये उत्तर कोरियाने लंडनमध्ये ४ सुवर्णपदके जिंकली होती. खेळाडू परतल्यावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. पण, यासोबतच त्या खेळाडूंना पुढील रिओ ऑलिम्पिकमध्ये ५ सुवर्णपदके जिंकण्याचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यावेळी, खेळाडूला पुढील वेळी एकूण १७ पदके आणण्यास सांगण्यात आले, यामध्ये ५ सुवर्ण आणि १२ इतर पदकांचा समावेश आहे. मात्र, रिओमध्ये उत्तर कोरियाच्या खेळाडूंना हे टारगेट पूर्ण करता आले नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR