सोलापूर (प्रतिनिधी )
भटके विमुक्त विकास परिषद महाराष्ट्र प्रदेश सोबत महसूल, पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विधानभवनाच्या दालनात भटक्या विमुक्त जातीतील नागरिकांना विविध प्रमाणपत्रे देण्यासंदर्भात आढावा बैठक झाली.यानंतर जिल्ह्यामध्ये ठिक ठिकाणी भटके तालुका स्तरीय शिबीर आयोजित केले तरी या शिबिरामध्ये भटके भामटा राजपूत समाजातील एका मुलाला पोलीस भरती साठी जातीचे प्रमाणपत्र न्हवते ,त्या मुलांना सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या व निवासी जिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांच्या हस्ते जातीचे प्रमाणपत्र देण्यात आले.
मनिषा कुंभार यांनी सोलापूर जिल्यात चांगल्या प्रकारे सहकार्य केल्या बद्दल त्यांचे संघटने कडून आभार व्यक्त केले सुनील पवार पेनुर व कार्यकर्ते यांनी सोलापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांची भेट घेतली.त्यांनी जिल्हयातील सर्व तालुक्यात भटके विमुक्त विकास परिषद च्या सहयोगातून विशेष शिबीरांचे आयोजन करण्याचे सर्व प्रांताधिकारी व तहसीलदार यांना निर्देश दिले.त्यानुसार उत्तर सोलापूर या तालुक्यात या गावी भटके विमुक्त समाजाच्या या समाजाच्या वस्तीवर विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या कामी मंडल अधिकारी व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कामकाज पाहिले .तसेच भटके विमुक्त विकास परीषदेचे तालुका संयोजक ॲड-निशांत परदेशी,अक्कलकोट तालुका संयोजक, संजय राठोड व कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले.