23.5 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रव्हेज भाज्यांसोबत मटण-मासेही महागले

व्हेज भाज्यांसोबत मटण-मासेही महागले

नाशिक : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीआधी पुन्हा एकदा महागाईचा भडका उडाला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. तर दुसरीकडे आता श्रावण सुरू असताना भाज्यांसोबत मटण- मासेही महाग झाले आहेत.

त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. श्रावणात पुन्हा एकदा ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे.

महागाईचा कहर सुरूच असून सर्वच भाज्यांनी शंभरी गाठली आहे. डाळी, मटण, मासे देखील महाग झाले आहेत. बदलत्या हवामानामुळे टोमॅटो, कोबी, मेथीसह इतर भाजीपाला रोगाच्या विळख्यात आले आहेत त्यामुळे आवक कमी झाली. तर श्रावणात अनेकजण मासे-मटण खाणे टाळत असल्याने भाज्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांसोबत किरकोळ बाजारात देखील जवळपास सर्वच भाजीपाल्याने प्रति किलो भावात शंभरी गाठली असून भाजीपाल्यासोबत डाळी, चिकन, मटण, मासेही महाग झाले आहेत. त्यामुळे महागाईने नागरिकांचे कंबरडे मोडले असू गगनाला भिडलेल्या महागाईचा सर्वांत जास्त फटका गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांना बसत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR