22 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रमहायुतीच्या समन्वय बैठकीत रवी राणांना डावलले

महायुतीच्या समन्वय बैठकीत रवी राणांना डावलले

लाडकी बहीण योजनेवरील वादग्रस्त वक्तव्य भोवले?

अमरावती : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज अमरावतीमध्ये महायुतीच्या समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला पश्चिम विदर्भातील महायुतीचे प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहेत परंतु स्थानिक आमदार रवी राणा यांना बैठकीचे निमंत्रण मिळाले नसल्याने लाडकी बहीण योजनेवरील वादग्रस्त वक्तव्य भोवल्याची चर्चा सर्वत्र आहे.
दरम्यान, संपूर्ण राज्याला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला विदर्भात चांगले यश मिळाले होते. अशातच, आज अमरावतीमध्ये महायुतीच्या समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पश्चिम विदर्भातील महायुतीचे प्रमुख पदाधिकारी बैठकीत सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे या बैठकीसाठी स्थानिक नेते म्हणून आमदार बच्चू कडू यांना निमंत्रण देण्यात आले असताना आमदार रवी राणा यांना मात्र निमंत्रण दिले नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे अनेक चर्चांना सध्या उधाण आले असून आमदार रवी राणा यांनी नुकतेच केलेले लाडकी बहीण योजनेवरील वादग्रस्त वक्तव्य त्यांना आता भोवलेय का? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

महत्त्वाचे म्हणजे या बैठकीसाठी स्थानिक नेते म्हणून प्रहारचे आमदार आणि गेल्या काही दिवसांपासून सरकारवर निशाणा साधणारे बच्चू कडू यांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. तर दुसरीकडे आमदार रवी राणा यांना मात्र निमंत्रण दिले नसल्याने अनेक चर्चांना सध्या उधाण आले आहे. त्यामुळे महायुतीतील उच्चपदस्थ नेते आमदार रवी राणांवर नाराज तर नाहीत ना? असा प्रश्नही या निमित्ताने आता उपस्थित केला जात आहे.

अमरावतीमधील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रमाणपत्र वितरण सोहळ्यावेळी बोलताना रवी राणा म्हणाले होते की, आमचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये हे आम्ही दुप्पट म्हणजे ३ हजार रुपये करू. आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. मात्र तुम्ही मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ म्हणून ते १५०० रुपये तुमच्या खात्यातून परत घेणार.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR