18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयआपत्तीच्या घटना प्रसारीत करताना तारीख आणि वेळ आवश्यक

आपत्तीच्या घटना प्रसारीत करताना तारीख आणि वेळ आवश्यक

नवी दिल्ली : नैसर्गिक आपत्ती आणि मोठ्या अपघातांची माहिती देताना वृत्तवाहिन्यांनी घटनेची तारीख आणि वेळ लिहिणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने खासगी वृत्तवाहिन्यांसाठी याबाबतचा सल्ला दिला आहे.केंद्र सरकारने खासगी वृत्तवाहिन्यांसाठी एक सल्ला दिला असून ज्यामध्ये नैसर्गिक आपत्ती आणि मोठ्या अपघातांची माहिती देताना घटनेची तारीख आणि वेळ लिहिणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. अपघात किंवा आपत्तीनंतर काही दिवसांनी टेलिव्हिजन चॅनेलवर दाखवले जाणारे फुटेज वास्तविक-वेळची परिस्थिती दर्शवू शकत नाही. त्यामुळे घटनास्थळांवर तारीख आणि वेळ लिहिणे आवश्यक असल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने म्हटले आहे.

प्रेषकांमध्ये कोणत्याही प्रकारचे गैरसमज होऊ नये म्हणून सर्व खासगी टीव्ही चॅनेलना नैसर्गिक आपत्ती किंवा मोठ्या अपघातांच्या दृश्यांमध्ये तारीख आणि वेळ फुटेजच्या शीर्षस्थानी प्रदर्शित करणे आवश्यक आहे. याची खात्री करण्यास सांगितले आहे. वृत्तवाहिन्या नैसर्गिक आपत्ती आणि मोठ्या अपघातांचे अनेक दिवस सतत कव्हरेज करत असतात. मात्र, घटनेच्या दिवसापासूनचे फुटेज दाखवत राहतात. मंत्रालयाने असा युक्तिवाद केला की अपघात किंवा आपत्तीनंतर अनेक दिवसांनी टेलिव्हिजन चॅनेलद्वारे दर्शवल्या जाणा-या फुटेजमध्ये वास्तविक वेळेची परिस्थिती प्रतिबिंबीत होत नाही. ज्यामुळे दर्शकांमध्ये अनावश्यक गोंधळ आणि संभाव्य दहशत निर्माण होते.

नियमांचे पालन करण्यावर भर
अपघात किंवा आपत्तीनंतर अनेक दिवसांनी टेलिव्हिजन चॅनेलद्वारे दर्शविलेले फुटेज वास्तविक-वेळची परिस्थिती प्रतिबिंबित करत नाही. ज्यामुळे दर्शकांमध्ये गोंधळ आणि घबराट निर्माण होते. त्यामुळे त्यावेळची वास्तवीक वेळ दाखवणे गरजेचे असल्याचा सल्ला मंत्रालयाने दिला आहे. खासगी वृत्तवाहिन्यांनी अशा घटनांचे प्रसारण करताना नियमांचे पालन केले पाहिजे, याची खात्री करण्यावर भर देण्यात आला आहे. वायनाड, केरळ आणि हिमाचल प्रदेशमधील भूस्खलनाच्या व्यापक कव्हरेजच्या पार्श्वभूमीवर ही सूचना जारी करण्यात आली आहे. ज्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला होता.

प्रेषकांची गफलत होऊ नये
अनेकदा मोठ्या नैसर्गिक घटना किंवा मोठे अपघात घडतात. अशा मोठ्या घटनांच्या बातम्या किंवा माहिती अनेकदा वृत्तवाहिन्यांवर प्रकाशीत केली जाते. मात्र, अनेकदा माहिती प्रकाशीत करताना ज्यावेळी घटना घडली. त्यावेळची तारीख आणि वेळ दिली जात नाही. यामुळे प्रेषकांची गफलत होण्याची शक्यता असते. कारण नेमकी घटना घडली कधी? यावरुन ते स्पष्ट होत नाही. त्यामुळे वृत्तवाहिन्यांनी आपत्तीच्या घटना देताना काळजी घेणे गरजेचे आहे. वेळ आणि तारीख देणे गरजेचे असल्याचा सल्ला सरकारने दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR