22 C
Latur
Friday, September 27, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात गणेशोत्सवादरम्यान ‘ड्राय डे’?

पुण्यात गणेशोत्सवादरम्यान ‘ड्राय डे’?

मंडळांनी केली पोलिस आयुक्ताकडे मागणी

पुणे : प्रतिनिधी
पुणे शहरातील गणेश मंडळांनी गणेशोत्सवात १० दिवस दारू बंद (ड्राय डे) ठेवण्यात यावी अशी मागणी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली आहे. गणेशोत्सावाच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील सभागृहात सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिका-यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी काही गणेश मंडळांनी ही मागणी केली आहे.

दरम्यान, गणेशोत्सव काही दिवसावर येवून ठेपला असून, घरोघरी बाप्पांच्या स्वागतासाठी भक्ताची तसेच सार्वजनिक मंडळांची तयारी सुरू आहे. त्याचबरोबर पोलीस व जिल्हा प्रशासनाकडूनही तयारी केली जात आहे. पुणे शहरातील गणेश मंडळांनी गणेशोत्सवात १० दिवस दारू बंद (ड्राय डे) ठेवण्यात यावी अशी मागणी पुणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

गणेश मंडळांच्या पदाधिका-यांच्या बैठकीत शहरातील ३०० मंडळांचे ६०० प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत त्यांच्या सूचना मांडल्या. तर ड्राय डे ठेवल्याने कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहील असा सुर या बैठकीत निघाला.

लेझर प्रकाशझोतांवर बंदी-आयुक्त अमितेश कुमार
दरम्यान, दुसरीकडे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील वैभवशाली विसर्जन परंपरा असलेल्या पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत गेल्या काही वर्षांपासून डोळे दिपवणा-या प्रकाशझोतांचा (लेझर बीम) वापर करण्यात येत आहे. लेझर प्रकाशझोतांमुळे डोळ्यांना इजा पोहोचल्याच्या घटना मागील वर्षी घडली होती. त्यामुळे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी विसर्जन मिरवणुकीत लेझर प्रकाशझोतांचा वापर करण्यास बंदी घातली आहे.

मंडळांना परवानगीसाठी एक खिडकी योजना
गेल्या वर्षी ज्या गणेश मंडळांनी परवानगी घेतली आहे त्यांना ५ वर्षे परवानगी घेण्याची गरज नसल्याची माहिती यावेळी आयुक्तांनी दिली. तसेच नवीन मंडळांसाठी एक खिडकी योजना लागू करण्यात येणार आहे. अनेक गणेश मंडळे हे वर्गणी न घेता उत्सव मंडळात स्टॉलला परवानगी देताना, या वेळी वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी. तसेच कमानी उभारताना देखील वाहतुकीचा विचार करून नियमात बसेल अशा पद्धतीने उभाराव्यात, अशा सुचना आयुक्तांनी दिल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR