28.4 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeक्रीडामाजी वेगवान गोलंदाज डोडा गणेश केनिया क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी

माजी वेगवान गोलंदाज डोडा गणेश केनिया क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाच्या माजी खेळाडूंना प्रशिक्षक पदासाठी जगभरातून मागणी वाढत आहे. अशातच टीम इंडियाच्या माजी गोलंदाजाची केनिया क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केनियाने टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज डोडा गणेशला मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्याने घसरण होत असलेल्या केनियासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो.

माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांच्या कोचिंगमध्ये केनियाने २००३ मध्ये एकदिवसीय विश्वचषकाची उपांत्य फेरी खेळली होती. तेव्हापासून संघाच्या कामगिरीत सातत्याने घसरण होत असून सध्या हा संघ आंतरराष्ट्रीय स्तरावरून जवळपास गायब झाला आहे. वनडे किंवा टी -२० मधील जगातील टॉप २० संघांमध्ये देखील सध्या केनियाचा समावेश नाही.

गणेशने या संघाचे प्रशिक्षकपद भूषवले
दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू डोडा गणेश यांनी २०१२-२०१३ मध्ये गोवा क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद भूषवले आहे. निवृत्तीनंतर गणेश राजकारणाबरोबरच मनोरंजन क्षेत्रातही सक्रिय राहिले. ते माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या जनता दल एसचे सदस्य होते. तर २०१६ मध्ये बिग बॉस कन्नडमध्ये ते स्पर्धक होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR