19.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रनितेश राणे शेंबडा पोरगा : इम्तियाज जलील

नितेश राणे शेंबडा पोरगा : इम्तियाज जलील

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
राज्यातील पोलिस कर्मचा-यांबाबत आक्षेपार्ह भाषा वापरणारे भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी आगपाखड केली आहे. नितेश राणे हे शेंबडे पोर त्याला महत्त्व देऊ नका. चांगला पोलिस अधिकारी असता तर त्याला मारले असते.
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही? नितेश राणेंपेक्षा घाण मी बोलू शकतो. तो सकाळी उठला की हिंदू हिंदू करतो. त्याला पोलिसांनी थोबाडीत मारली पाहिजे होती, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले.

नितेश राणे यांनी मंगळवारी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या शिवशक्ती-भीमशक्ती जनआक्रोश मोर्चाच्या व्यासपीठावरून पोलिस अधिका-यांना इशारा दिला होता. सरकार हिंदूंचे आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पाठवू की जिथून तुमच्या बायकोलाही फोन लागणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. मी काही निवेदन वगैरे देत बसत नाही, ती भाषा मला जमत पण नाही. मी डायरेक्ट कार्यक्रम करतो. पोलिस ठाण्यात लव्ह जिहादबाबत तक्रार देण्यात येणा-या मुलीची तक्रार अर्ध्या तासात घे

तली पाहिजे, अन्यथा पुढच्या तीन तासांत पोलिस ठाण्यात दाखल होऊन धिंगाणा घालू, असे नितेश राणे यांनी म्हटले होते.

नितेश राणे यांच्या या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ झाला होता. मात्र, बुधवारी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतान पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याचे समर्थन केले होते. पोलिस अधिका-यांसंदर्भातल्या वक्तव्यावर आपण कायम असल्याचे राणे यांनी सांगितले. पीडित मुलींच्या आईवडिलांचे ऐकून घेणार नसेल, न्याय मिळवून देण्यापेक्षा पीडितांची चौकशी करणार असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका घेणे माझे कर्तव्य असल्याचे नितेश राणे म्हणाले.

विरोधकांच्या इशा-यावर जे अधिकारी काम करणार असतील तर अशा अधिका-यांनी आपली वर्दी वाचवून दाखवावी, असा इशारा नितेश राणे यांनी दिला. ज्या अधिका-यांमुळे गृह खाते बदनाम होत आहे, त्यांची तक्रार गृहमंत्र्यांकडे करून कारवाईची मागणी करणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR