नवी दिल्ली : ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. यावेळी प्रशांत नीलच्या ‘केजीएफ’ या चित्रपटाने बाजी मारली आहे. ‘केजीएफ’ला दोन प्रकारात पुरस्कार मिळाले आहेत. त्याचबरोबर ‘गुलमोहर’ या मालिकेसाठी मनोज बाजपेयी यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
प्रीतमला रणबीर कपूर स्टारर ‘ब्रह्मास्त्र’ साठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तर ‘कांतारा’ चित्रपटासाठी ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार आणि नित्या मेनन, मानसी पारेखला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
यंदा अनेक चित्रपट पुरस्कार जिंकण्याच्या शर्यतीत होते. यामध्ये विक्रांत मॅसीच्या ‘१२वी फेल’, ‘कथाल’, ‘ओएमजी २ ’ आणि ‘थ्री ऑफ अस’ या नावांचा समावेश होता. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीमध्ये विक्रांत मॅसी, मामूट्टी आणि ऋषभ शेट्टी यांच्यात चुरस होती. मात्र ऋषभ शेट्टीने बाजी मारली. २०२३ मध्ये अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ‘पुष्पा : द राईज’ या चित्रपटासाठी त्यांना हा सन्मान मिळाला होता. त्याचवेळी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आलिया भट्टला ‘गंगूबाई काठियावाडी’ साठी आणि क्रिती सेननला ‘मिमी’ साठी मिळाला होता.
कोणकोणत्या प्रकारात जिंकले राष्ट्रीय पुरस्कार?
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म – अट्टम (मल्याळम) सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – गुलमोहर
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – सूरज बडजात्या (उंचाईया) सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक (पार्श्वभूमी) – ए. आर. रहमान (पोनियिन सेलवन १)
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट पुरस्कार – कांतारा (ऋषभ शेट्टी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री-नित्या मेनन, मानसी पारेख
राष्ट्रीय, सामाजिक चित्रपट अंक – कच्छ एक्स्प्रेस (गुजराती)
सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट – केजीएफ २
सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट – पोन्नियान सेलवन १
सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट – कार्तिकेय २
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – काबेरी अंतरधन सर्वोत्कृष्ट तैवा चित्रपट – सिकाइसल
सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट – सौदी वेल्लाक्का सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट – इमुथी पुठी ण करून वडिलांचे स्मरण केले.